Former MLA Ramesh Thorat to officially join Ajit Pawar’s NCP faction at Varvand on August 1. Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

Local Body Elections In Maharashtra : दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी शरद पवारांचा गट सोडून अजित पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. वरवंड येथे 1 ऑगस्ट रोजी प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

Namdeo Kumbhar

  • रमेश थोरात यांनी शरद पवारांचा गट सोडून अजित पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 1 ऑगस्ट रोजी वरवंड येथे त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

  • स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

  • दौंड तालुक्यातील राजकारणावर याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील दौंडमधील शरद पवार यांचे शिलेदार, माजी आमदार रमेश थोरात यांनी साथ सोडली आहे. रमेश थोरात अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हातात घड्याळ बांधणार आहेत. रमेश थोरात यांनी शरद पवार यांच्याकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. आता ते सत्ताधारी अजित पवारांच्या पक्षात सामील होत आहे. शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. रमेश थोरात यांचे दौंड आणि परिसरात मोठं वजन आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी साथ सोडल्यामुळे शरद पवार यांना निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार रमेश थोरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एक ऑगस्ट रोजी वरवंड या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. रमेश थोरात यांच्यासोबत अनेक पदाधिकारीही घड्याळ हातात घेणार असल्याचे समजते.

दौंडचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत एक ऑगस्ट रोजी वरवंड या ठिकाणी प्रवेशसोहळा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काका आणि पुतण्यांमध्ये पक्ष विभागला गेला होता. भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदांच्या निवडणुका लक्षात घेता रमेश थोरात यांचा प्रवेश राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे..

दौंड तालुक्यात आमदार कुल आणि रमेश थोरात यांची मोठी ताकद आहे. पक्ष कुठलाही असो, त्याला पाठबळ मात्र कुल आणि थोरात यांचे असतेच. तेव्हा सध्या तरी कुल आणि थोरात हेच दोन गट तालुक्यात कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला रामराम ठोकून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. परिणामी त्यांनी राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांचा काळ लोटल्यानंतर रमेश थोरात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा पुन्हा निर्णय घेतला.

रमेश थोरात कोण आहेत?

दौंडचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात हे शरद पवार गटाचे शिलेदार मानले जात होते.

रमेश थोरात यांनी कोणता राजकीय निर्णय घेतला आहे?

रमेश थोरात यांनी शरद पवारांचा पक्ष सोडून अजित पवारांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

रमेश थोरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये कधी प्रवेश होणार आहे?

ऑगस्ट रोजी वरवंड येथे अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत प्रवेश होणार आहे.

रमेश थोरात यांच्या या निर्णयामुळे कोणत्या राजकीय घडामोडी होऊ शकतात?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा मोठा धक्का शरद पवार गटाला बसू शकतो आणि दौंडमधील समीकरणे बदलू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT