पुणे शहरात पाणी कपात करण्यात आली आहे
पुण्यात १५ जूनपासून दिवसाआड पाणी येणार
पुणे महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय
धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी कपात करण्यात आली
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यावर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे. अखेर पुणे महानगर पालिकेकडून शहरामध्ये पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. १५ जूनपासून पुण्यात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पुणे महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
पुणे शहरामध्ये येत्या सोमवारपासून म्हणजेच १५ जूनपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या काळामध्ये पुणे शहरातील खासगी स्विमिंग पूलचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय देखील पालिकेकडून घेण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे बांधकामांना देखील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. याबाबत पुणे महापालिका प्रशासनाकडून मसुदा तयार करण्यात आला आहे. पाणी कपातीदरम्यान जर कुणी पाण्याचा अतिवापर करत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
- कोणत्याही बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरयात येऊ नये. याकरता एसटीपीचे पाणी अथवा बोअरवेलचे/विहिरीचे पाणी वापरण्यात यावे.
- घरातील सर्व नळ तसेच, सार्वजनिक स्वच्छतागृहे येथील नळ कनेक्शन, फ्लश टाक्या आणि पाईपलाईनमधील गळती ताकाळ तपासून ती दुरुस्ती करावी.
- शासकिय तसेच पुणे मनपाच्या मालकिच्या सर्व इमारतींमधील नळजोड/वॉशम/फ्लश टँक तपासून गळती बंद करावी.
- सावजिनक तसेच, खासगी वॉशिंग सेंटस बंद करण्यात यावी वाहन धुणे, अंगण कंवा पदपथ स्वच्छ करणे यासाठी बोरिंग अथवा पुणे महानगरपालिकेच्या पाण्याचा वापर टाळावा.
- खासगी आण सार्वजनिक स्विमिंग पूल तसेच खासगी/मनपाच्या उद्यानांकरता पिण्याचा पाण्याचा वापर करणं बंद करण्यात यावे.
- ज्या खासगी सोसायट्यांना एसटपी बांधण्यात आला आहे त्या एसटपी काया वत ठेवणे बंधनकारक आहे. तसेच, बंद एसटपी सुरू करून त्या पाण्याचा पुनर्वापर गार्डनिंग आणि फ्लशिंगकरता करण्यात यावा.
- आंघोळ, भांडी धुणे आणि कपडे धुणे यासाठी आवयक तेवढ्याच पाण्याचा वापर करावा.
- पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाही याची दक्षता घ्यावी व आवश्यक असल्यास ऑटोमॅटिक फ्लोट व्हॉल्व्हचा वापर करावा.
दरम्यान, मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला पण अद्याप तो संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय झाला नाही. १५ जूननंतर संपूर्ण राज्यात पाऊस जोर धरेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. धरणातील पाणी पातळी कमी होत चालल्यामुळे अखेर पालिकेने पाणी कपातीबाबत निर्णय घेतला. आता सोमवारपासून पुण्यात दिवसाआड पाणी येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.