sealed, bhugaon gram panchayat news  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Goa Highway News : कशेडी बोगद्याचे काम करणाऱ्या कंपनीचा प्लॅंट सिल, भोगाव खुर्द ग्रामपंचायतीची कारवाई

bhugaon gram panchayat news : या कारवाईची गावात जाेरदार चर्चा सुरु आहे.

Siddharth Latkar

- सचिन कदम

Mahad News : कशेडी बोगद्याचे काम करणाऱ्या शिंदे डेव्हलपर्स कंपनीने २६ लाख रुपयांचा कर थकविला आहे. या थकबाकीची वसूली व्हावी यासाठी भोगाव खुर्द ग्रामपंचायतीने कंपनीच्या प्लँटला सिल ठोकले आहे. या कारवाईची ग्रामपंचायत परिसरात जाेरदार चर्चा सुरु आहे. (Maharashtra News)

मुंबई गोवा महामार्गावरील (mumbai goa highway) कशेडी बोगद्याचे काम शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करत आहे. या कंपनाने ग्रामपंचायतीच्या जागेवर त्यांचे प्लँट उभे केले आहेत. दरम्यान कंपनीने 26 लाख रुपयांचा कर थकवल्याचा दावा ग्रामपंचायतीने केला आहे.

ग्रामपंचायत सदस्य सुरेश कदम साम टीव्हीशी बाेलताना म्हणाले शिंदे डेव्हलपर्स कंपनीने वापरलेल्या जागेसाठीचा कर भरण्यासाठी ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा केला. परंतु कंपनीने त्याची दखल घेतली नाही.

त्याच बरोबर बोगद्याच्या जोड रस्त्याच्या कामांमुळे गावातील अंतर्गत रस्ते आणि नळपाणी पुरवठा योजना बाधित झाली होती. त्याचीही भरपाई कंपनीने केली नसल्यामुळे ग्रामपंचायतीने पोलादपूरमधील प्लॅंटला सिल ठाेकरे आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Shirsat: तुम्ही पण खा, आम्ही पण खाऊ"; संजय शिरसाटांच्या व्हिडिओवर इम्तियाज जलील यांचा सरकारवर घणाघात|VIDEO

Mumbai : मुंबईत राज ठाकरेंची डरकाळी! मनसेकडून 'मराठीची पाठशाळा', अमराठी व्यापाऱ्यांसाठी भाषेचा 'क्लास'

Mega Block : रविवारी मध्य-हार्बर रेल्वे मार्गावर ५ तासांचा मेगा ब्लॉक; कधी, कुठे आणि किती वाजता?

Kitchen Sponge: तुमचा भांडी घासण्याचा स्पंज टॉयलेट सीटपेक्षाही घाण; एकच स्पंज वापरण्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम?

‘या’ ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना असतो Brain Stroke चा अधिक धोका

SCROLL FOR NEXT