पुणे: पुण्यामधील भोसरी जमीन घोटाळा (Pune Bhosari Land Case) प्रकरणी एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) पत्नी मंदाकिनी खडसेंना (Mandakini Khadse) हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. याअगोदर कोर्टाने तूर्तास अटक न करण्याचे ईडीला निर्देश दिले होते. तसेच तपास यंत्रणेला या तपासामध्ये सहकार्य करण्याचे निर्देश खडसेंना देण्यात आले होते. दरम्यान, आज परत एकदा मुंबई हायकोर्टाचा (Mumbai High Court) दिलासा मिळाला आहे, तर पुढील सुनावणी १४ मार्च दिवशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
हे देखील पहा-
पुणे भोसरी जमीन घोटाळ्यात खटल्याला वारंवार गैरहजर राहिल्यामुळे पीएमएलए (PMLA) कोर्टाकडून मंदाकिनी खडसेंविरोधामध्ये याअगोदर अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान देता यावे याकरीता ३ आठवड्यांची स्थगिती खडसेंच्या वतीने मागण्यात आली होती. मात्र, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली होती. एकनाथ खडसेंना मात्र, याप्रकरणी कोर्टाने वैद्यकीय कारणास्तव तूर्तास दिलासा देण्यात आला होता.
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडनं आलेला पैसा वापरल्याचं कागदोपत्री निष्पन्न झालेलं आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचं सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीकरिता बोलावून त्यांना अटक केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.