Hindustani Bhau: हिंदूस्थानी भाऊला अखेर जामीन मंजूर

विकास पाठकला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
Hindustani Bhau
Hindustani BhauSaam Tv
Published On

मुंबई: दहावी-बारावीचे विद्यार्थ्यांना आंदोलनकरिता (Student Protest ) भडकवल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) उर्फ विकास पाठकला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता हिंदुस्तानी भाऊला मुंबई सत्र न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या मागणीकरिता विद्यार्थांना चिथावल्याबद्दल फाटक याला १ रोजी अटक करण्यात आली होती. हिंदुस्थानी भाऊला जामीन मंजूर झाला असून मुंबई सेशन कोर्टने जामीन मंजूर केला आहे. धारावीतील हिंसक आंदोलन प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. हिंदुस्थानी भाऊच्या वतीने ऍड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला होता. याअगोदर हिंदुस्तान भाऊचा बांद्रा महानगर दंडाधिकारी कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला होता. ((Hindustani Bhau Latest News In Marathi )

हे देखील पहा-

काय होत प्रकरण-

मुंबई: राज्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन (Online examination) घेण्यात यावे, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आंदोलन सुरू केले होते. (Students protest). मुंबईत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

Hindustani Bhau
Maha IT Scam Case: संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना अमोल काळेंचे चोख उत्तर, म्हणाले...

धारावी पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) अर्थात विकास पाठक (Vikas Pathak) याला अटक करण्यात आली आहे. धारावी पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊ म्हणजे विकास पाठक याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये सर्वप्रथम हिंदुस्थानी भाऊ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com