Maha IT Scam Case: संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना अमोल काळेंचे चोख उत्तर, म्हणाले...

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर चांगलीच टीका केली
Maha IT Scam Case:  संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना अमोल काळेंचे चोख उत्तर, म्हणाले...
Maha IT Scam Case: संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना अमोल काळेंचे चोख उत्तर, म्हणाले...सुशांत सावंत
Published On

सुशांत सावंत

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत भाजप (BJP) नेत्यांवर चांगलीच टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या (Devendra Fadnavis) काळामध्ये सर्वात मोठा महाआयटी घोटाळा (Maha IT Scam) झाला होता. महाआयटीमध्ये तब्ब्ल २५ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. अमोल काळे (Amol Kale) कोण आहे. विजय ढवंगाळे कोण आहे. या सर्वांची खाती, बँक व्यवहार, कुणाला कंत्राट दिले आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी केला होता. (Amol Kale reply allegations made by Sanjay Raut)

हे देखील पहा-

यानंतर संजय राऊत यांनी या घोटाळ्यातील आरोपींना पळवून लावण्यात आले आहे, अशी धक्कादायक माहिती दिली होती. मागील २ दिवसांपासून ज्या अमोल काळे यांचे नाव समोर येत आहे. ते अमोल काळे अखेर आता समोर आले आहेत. अमोल काळे यांनी एक पत्रक काढले आहे. त्याद्वारे अमोल काळे यांनी आपली बाजू मांडली आहे. याचबरोबर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आली आहे.

आपल्या पत्रकात अमोल काळे यांनी सांगितले आहे की, मी एक खाजगी व्यावसायिक तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. मागील २ दिवस तसेच आज सकाळी विविध वृत्तवाहिन्यांवर तसेच समाजमाध्यमांवर काही नेत्यांचे माझ्या संदर्भात असलेले वक्तव्ये बघण्यात आणि वाचण्यात आली आहेत. ही सारी वक्तव्ये पूर्णत: दिशाभूल करणारी आणि माझी बदनामी करणारी आहेत.

Maha IT Scam Case:  संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना अमोल काळेंचे चोख उत्तर, म्हणाले...
Nashik Crime: डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांडात धक्कादायक खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाचे कुठलेही कंत्राट आणि टेंडर मी घेतले नाही. माझ्या खाजगी व्यवसायाचे संपूर्ण तपशील माझ्या प्राप्तिकर विवरणात नमूद करण्यात आले आहेत. असे असताना देखील केवळ संभ्रम निर्माण करण्याकरिता माझी हेतू पुरस्कर बदनामी जे नेते करत आहेत, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर करावाई मी प्रारंभ करतो आहे. यामुळे मी कुठे देखील परदेशात जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com