Bhiwandi News Saam Tv
मुंबई/पुणे

Bhiwandi News: टेम्पो अडवल्याने चालकाची सटकली, भररस्त्यात वाहतूक पोलिसाला शिवीगाळ अन् बेदम मारहाण; पाहा VIDEO

Bhiwandi Traffic Police: भिवंडीमध्ये वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. टेम्पो चालकाने या पोलिसाला मारहाण केली. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

फैय्याज शेख भिवंडी

भिवंडीमध्ये वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहतूक पोलिसाने टेम्पोला अडवले त्यामुळे चालकाने संतप्त होत आधी शिवीगाळ केली त्यानंतर वाहतूक पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भररस्त्यात वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील भिवंडी-ठाणे मार्गावर पूर्णा गावाजवळ ही घटना घडली. वाहतूक पोलिस आणि टेम्पो चालकामध्ये हाणामारी झाली. टेम्पो चालकाला पोलिसाने थांबण्यास सांगितले. पण टेम्पो चालकाने न थांबता वाहतूक पोलिसाला शिवीगाळ केली. वाहतूक पोलिसाने पुन्हा या टेम्पो चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पोलिसाला मारहाण केली.

टेम्पोला थांबवले म्हणून चालक आणि वाहतूक पोलिस या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केली. वाहतूक पोलिसाने देखील या चालकाला चांगला चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. विजय चव्हाण असे वाहतूक पोलिसाचे नाव आहे. या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नारपोली पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, नालासोपाऱ्यामध्ये वाहतूक पोलिसांना भरचौकात बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. नालोसोपाऱ्यातील प्रगती नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. दुचाकीला अडवल्यामुळे झालेल्या बाचाबाचीमध्ये बापलेकाने दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी बापलोकाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, १० जणांचा बळी, ३३७ जनावरे दगावली

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त भागात दौरा

Jio Cheapest Plan: जिओ यूजर्ससाठी खुशखबर! वर्षभरासाठी रिचार्जचं 'नो टेन्शन', वर्षभराचा रिचार्ज प्लॅन जाणून घ्या

Solapur-Pune highway Closed : पावसाचे रौद्ररूप, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा

GST Rate Cut: सरकारचा मोठा निर्णय! GST कपात न दिल्यास दुकानदार आणि कंपन्यांवर होणार कारवाई; अशी करा तक्रार

SCROLL FOR NEXT