Bhimashankar Mandir Saam Tv
मुंबई/पुणे

Bhimashankar Mandir: महत्त्वाची बातमी! भीमाशंकर मंदिर 3 महिन्यासाठी राहणार बंद; कारण काय?

Bhimashankar Mandir Closed for 3 Months: भीमाशंकर मंदिर पुढच्या वर्षात सुरुवातीला ३ महिने बंद राहणार आहे. मंदिराच्या परिसरात काम सुरु होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhi Hande

भीमाशंकर मंदिर पुढील ३ महिन्यांसाठी बंद राहणार

मंदिराच्या परिसरात काम होत असल्याने निर्णय

प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून मंदिर प्रशासनाचा निर्णय

महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे भीमाशंकर मंदिर. आता भीमाशंकर मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी पुढील तीन महिने बंद राहणार आहे. हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ठिकाणी हजारो भाविक येतात. जर तुम्हीही भीमाशंकरला जाण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

१ जानेवारीपासू मंदिर राहणार बंद

१ जानेवारीपासून पुढील तीन महिने भिमाशंकर मंदिर बंद राहणार आहे. पुढील वर्ष सुरु होत असल्याने भिमाशंकरला विकास आराखड्यातुन नव्याने विकास कामे होत आहेत.

भिमाशंकर विकास आराखड्यात मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे नव्याने काम होणार आहे. हे काम होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी मुख्य मंदिर दर्शानासाठी तीन महिने बंद रहाणार आहे. मंदिर प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

भिमाशंकरला येणा-या भाविकांची संख्या गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुढील आठ दिवसात यासाठी प्रशासकिय पातळीवर पाहणी करुन नियोजन केलं जाणार आहे. त्यानंतर पुढील कामांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

सध्या ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त सलग सुट्ट्या आहे. या सुट्ट्यांमध्ये अनेकजण फिरायला जाण्याचा प्लान करतात. अनेकजण तर भीमाशंकरला देवस्थानला जाण्याचाही प्लान करत असतील. जर तुम्हालाही भीमाशंकरला जायचे असेल तर १ जानेवारी २०२६ आधी जाऊन या. त्यानंतर मंदिर बंद राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT