Bhima River Accident Saam tv
मुंबई/पुणे

Bhima River Accident : भीमा नदीत बुडालेली बोट ३५ फूट खोल पाण्यात सापडली; ६ जण दगावल्याची शक्यता

मंगेश कचरे

पुणे : पुण्यातील इंदापूर तालुक्यातील भीमा नदीत मंगळवारी बोट बुडाल्याची घटना घडली. नदीतील बोट उलटल्याने ६ प्रवासी पाण्यात बुडाले.त्यानंतर बोटीमधील प्रवासी आणि बोटीचा शोध घेण्यासाठी आज सकाळी एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखलं झालं. यावेळी या पथकाला नदीत बुडालेली बोट ३५ फूट खोल पाण्यात सापडली आहे. यावेळी पाण्यात बुडालेले ६ दगावल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पथकाकडून या लोकांचा शोध सुरु आहे.

इंदापुरातील भीमा नदीत बडालेल्या सहा लोकांचा पुन्हा शोध सुरु करण्यात आला आहे. भीमा नदीत बोट उलटून सहा लोक बुडाले होते. या बुडालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी सकाळी एनडीआरएफ पथक घटनास्थळी पोहोचलं.

या बोटीत सात प्रवासी होते. त्यातील एक प्रवासी पोहून पाण्यातून बाहेर आला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. तर बोटीमधील सहा व्यक्तींचा कालपासून शोध सुरु आहे. बुडालेल्या सहा जणांचा शोध लागलेला नाही.

रात्री नऊ वाजता शोधकार्यात अडथळ येत होता. त्यामुळे शोध मोहीम थांबवली होती. त्यानंतर आज सकाळी सात वाजता एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचत शोध मोहीम सुरु केली. नदीत बेपत्ता असलेल्यांमध्ये तीन पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

इंदापूर तालुक्यातील कळाशी गावाच्या पायथ्याशी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बोट उलटल्याची घटना घडली. करमाळा तालुक्यातील कुगावमधून इंदापूर तालुक्यातील कळशीकडे एक बोट प्रवाशांना घेऊन येत होती. जोराचा वारा सुटल्याने बोट भीमा नदीत बुडाली. या बोटीत ७ जण होते. त्यापैकी एक पाण्यातून पोहून बाहेर आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT