भीमा कोरेगाव दंगल प्रकरण; परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स Saam Tv
मुंबई/पुणे

भीमा कोरेगाव दंगल प्रकरण; परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स

फोन टॅपिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला आणि १०० कोटी वसुली प्रकरणाने बेपत्ता झालेले परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : फोन टॅपिंग प्रकरणामुळे phone tap case अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला rashmi shukla आणि १०० कोटी वसुली प्रकरणाने बेपत्ता झालेले परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी Bhima Koregaon case चौकशी आगोयाने दोघांनाही समन्स बजावला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाची आयोगाच्या मार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगामार्फत दिले आहे.

हे देखील पहा-

आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला. त्यावेळी परमबीर सिंग हे ADG law आणि शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त होते. हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट आणि इतर माहिती महत्वाची असल्यामुळे, त्यांची साक्ष आवश्यक असल्याचे आशिष सातपुते यांनी सांगितले आहे. सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी परमबीर आणि रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक आणि राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना अधिकाऱ्यांच्या बदल्यांविषयी अनेक मंत्र्यांच्या पीएनजी तसेच काही खाजगी व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आले होते. याबाबत एक अहवाल देखील त्यांनी तयार केला होता. याच प्रकरणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात युद्ध लागले असून रश्मी शुक्ला यांना या प्रकरणी जबाब देण्यास मुंबई पोलिसांनी भाग पाडले आहे. यानंतर आता परत एकदा भीमा कोरेगाव प्रकरणी रश्मी शुक्ला यांना चौकशीला बोलवले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT