MLA Bhaskar Jadhav Saam TV
मुंबई/पुणे

'आपण यांना पाहिलं का?'; राणे विरुद्ध जाधव वाद पेटला, भास्कर जाधवांविरोधात मुंबईत बॅनरबाजी

भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर -

मुंबई: मुंबईतील माहीम परिसरात भाजपकडून भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'आपण यांना पाहीलात का ? शोधून आणणाऱ्याला ११ रू बक्षिस' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आल्यामुळे ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजपा (Shivsena Vs BJP) वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेनेचे गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याने भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्या विधानामुळे कोकणातील राणे समर्थक देखील संतापले आहेत.

पाहा व्हिडीओ -

अशातच मंगळवारी रात्री जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. शिवाय जाधव यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर हा हल्ला झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. दरम्यान जाधव विरुद्ध राणे हा वाद काही कमी होण्याचं दिसतं नाहीये.

कारण मुंबईत भाजपकडून आता भास्कर जाधव यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. आपण यांना पाहीलात का ? शोधून आणणाऱ्याला ११ रू बक्षिस अशा आशयाचे बॅनर लावत जाधवांच्या वक्तव्याचा निषेध भाजपकडून करण्यात येत आहे.

मुंबईतील माहीम परिसरामध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत. भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य चांगलेच अंगलट आल्याचं दिसतं आहे. जाधव यांच्या सुरक्षेत करण्यात आलेली कपात, घरावरती हल्ला, जाधवांविरोधात गुन्हा आणि आता ही बॅनरबाजी त्यामुळे भाजप जाधवांच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाले असून त्याचे पडसाद कोकणातून मुंबईत देखील उमटायला सुरुवात झाल्याचं दिसून आले आहे.

बॅनर हटवले -

'आपण यांना पाहिलंत का ? शोधून आणणाऱ्यास अकरा रुपयांचे बक्षीस...!' अशा आशयाचे बॅनर शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात काल रात्री मुंबईतील माहीम परिसरात लावण्यात आले होते. मात्र, कायदा-सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने रात्रीचे हे बॅनर हटवल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT