Bhaskar Jadhav News Saam TV
मुंबई/पुणे

'हा' सभागृहाचा हक्कभंग, माहिती माध्यमांमध्ये कशी गेली? भास्कर जाधव कडाडले

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांना सादर केलेला पेन ड्राईव्ह माध्यमामध्ये कसाकाय गेला. सभागृहातील माहिती बाहेर कशी गेली. त्यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी आक्षेप घेतला आहे. सभागृहातील माहिती बाहेर कशी जाते? पेन ड्राईव्ह अध्यक्षांना दिला होता, माध्यमांना माहिती कोणी दिली. हा सभागृहाचा हक्कभंग असल्याचंही भास्कर जाधव म्हणाले.

दरम्यान फडणवीस पेन ड्राईव्ह प्रकरणी उत्तर देणार असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले होते. त्यापार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी आज विधानसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पेन ड्राईव्ह केस प्रकरणी सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केलीये, मुंबई पोलिसांवर फडणवीसांचा विश्वास नाही का, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तसेच, या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार असंही त्यांनी सांगितलं.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकून एकच खळबळ उडवली होती. आज देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात पुन्हा एक पेन ड्राईव्ह दिला. त्यामुळे आता पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली आहे. फडणवीसांनी अल्पसंख्यांक विभागच्या लोकांचा दाऊदशी सबंध आला तर काम देणार का? असा प्रश्न विचारला. फडणवीसांनी पेन ड्राईव्ह देवून त्यातील संभाषणाचा पाढा वाचला. मोहंमद अर्शद खान, डॉ.मुद्दस्सिर लांबे यांच्यातील हा संवाद आहे. आणि हे दोघेही waqf board चे सदस्य असल्याचं फडणवीसांनी सांगितले. त्याचबरोबर यांना नवाब मलिक यांनी नियुक्त केल्याचंही फडणवीस म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT