Bhandup Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Bhandup News: अभ्यास करावा म्हणून आई ओरडली, १४ वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल

Bhandup Police Station: १४ वर्षांच्या मुलाने भांडूपमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली. भांडूप पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या रुणवाल ग्रीन्स इमारतीमध्ये ही घटना घडली.

Priya More

मयूर राणे, मुंबई

भांडूपमध्ये १४ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईने अभ्यास करण्यास सांगितल्यामुळे या मुलाने टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरातच त्याने गळफास लावून आत्महत्या केली. भांडूपमधील एका उच्भ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी भांडूप पोलिसांनी मुलाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भांडूप पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या रुणवाल ग्रीन्स इमारतीमध्ये ही घटना घडली. या इमारतीमध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय मुलाने बेडरुममधील फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. आईने अभ्यास करण्यास सांगितल्यानंतर मुलाने गळफास लावन जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच भांडूप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मुलाला तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. याप्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ डिसेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. इयत्ता नववीचा विद्यार्थी असलेल्या मुलाने त्याच्या बेडरूममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्याने गळफास लावण्यासाठी नायलॉनच्या दोरीचा वापर केला. बेडरूमचा दरवाजा उघडल्यानंतर त्याच्या आईला धक्कादायक दृश्य दिसले.

पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेतील मुलाल ताबडतोब खाली उतरवण्यात आले. त्याला तात्काळ फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. आईने वारंवार अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितल्याने मुलाने हे कठोर पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी चौकशीतून लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT