ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रेबीज हा एक वायरल इन्फेक्शन आहे, जे कुत्रे, मांजरी, माकडे यांसारख्या संक्रमित प्राण्यांच्या चावण्याने किंवा चाटण्याने होतो. हा विषाणू मानवांच्या मज्जासंस्थेवर हल्ला करतो आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यूही होऊ शकतो.
एखाद्या संक्रमित प्राण्याच्या चावण्याने, चाटण्याने किंवा नख मारल्याने रेबीज होऊ शकतो. हा वायरस प्राण्यांच्या लाळेद्वारे पसरतो. कुत्रा किंवा इतर प्राणी चावल्याने देखील रेबीज होऊ शकतो.
कधीकधी प्राण्याने चावलेल्या ठिकाणी जळजळ, मुंग्या येणे किंवा खाज सुटणे असे संवेदना होतात. हे विषाणू पसरण्यास सुरुवात झाल्याचे लक्षण असू शकते.
रेबीजमध्ये शरीराला खूप ताप, अशक्तपणा आणि सामान्य थकवा जाणवतो. ही लक्षणे वायरल तापासारखी वाटू शकतात परंतु रेबीजमध्ये ही लक्षणे वेगाने वाढतात.
रेबीजचे एक विशेष लक्षण म्हणजे घसा कोरडा पडणे किंवा पाणी पाहून भीती वाटणे. यमध्ये व्यक्ती पाणी पिण्याचा प्रयत्न करतो पण घशाचे स्नायू आकुंचन पावतात.
याशिवाय, शरीराच्या वेगवेगळ्या भागात अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे पॅरालिसिस होण्याचा धोका वाढतो. ही स्थिती श्वसनलिकेवर आणि हृदयाच्या ठोक्यांवर देखील परिणाम करु शकते.
अशावेळी चिडचिड, राग किंवा मानसिक असंतुलन यासारखी लक्षणे दिसू लागतात. कधीकधी ती व्यक्ती विचित्र गोष्टी करू लागते किंवा हिंसक होऊ शकते.