'अडाण्यांनी याबाबत शहाणपणा करू नये' : भालचंद्र शिरसाट Saam tv new
मुंबई/पुणे

'अडाण्यांनी याबाबत शहाणपणा करू नये' : भालचंद्र शिरसाट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामकरणाबाबत कोणतीही तडजोड अथवा अक्षम्य दिरंगाई आम्ही सहन करणार नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Mumbai International Airport) नामकरणाचा मुद्दा सध्या शिगेला पोहचला आहे. विमानतळाच्या नामकरणासाठी अनेक नावे समोर येत होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांचेच (Chatrpati Shivaji Maharaj Internation Airport) नाव विमानतळाला देण्याची मागणी राज्यात वाढू लागली आहे. याबाबत भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट (BJP Leader Bhalchandra Shirsat) यांनी ट्विट करत अदानी समुहाला इशारा दिला आहे. (Bhalchandra Shirsat warned the Adani group about the name of Mumbai Airport.)

दोन दिवसांपुर्वी विमानतळाबाहेर लावण्यात आलेला अदानींच्या नावाचा नामफलक आक्रमक शिवसैनिकांनी तोडला. यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामकरणाबाबत कोणतीही तडजोड अथवा अक्षम्य दिरंगाई आम्ही सहन करणार नाही. मग तो उड्डाणपूल असो की विमानतळ ! अडाण्यांनी याबाबत शहाणपणा करू नये हा इशारा !'' असे ट्वित करत भालचंद्र शिरसाट यांनी अदानी समुहाला इशारा दिला आहे.

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil), हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यासाठी बराच वादंग महाराष्ट्रात पाहायला मिळाला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी काही दिवसांपुर्वी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी आंदोलनही केले. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी दिलेल्या एका मुलाखतीत विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव लागावे, अशी ठाम भुमिका मांडली होती.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT