Mumbai: मुंबईकरांना आजपासून २४ तास बेस्टची सेवा Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: मुंबईकरांना आजपासून २४ तास बेस्टची सेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये बेस्टद्वारे आजपासून २४ तास सेवा दिली जाणार आहे. मध्यरात्रीपासून ते पहाटे ५ पर्यंत मुंबईमधील ६ मार्गावर बेस्ट बस (BEST) धावणार आहेत. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या मुंबईकरांसाठी सुरक्षित आणि स्वस्त सार्वजनिक सेवा देण्याचा प्रयत्न बेस्टमार्फत (Best) यापुढे केला जाणार आहे. (BEST service to Mumbaikar 24 hours from today)

हे देखील पहा-

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. २४\७ कार्यरत असलेले शहर मुंबईमध्ये (Mumbai) आता २४\७ बस सेवा असणार आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणार्‍या मुंबईकरांसाठी सुरक्षित आणि कदाचित जगात सर्वात स्वस्त सार्वजनिक वाहतूक (Transportation) बस सेवेपैकी एक असलेली बेस्ट रात्रीच्या बसेस सुरू करत आहे, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये (tweet) सांगितले आहे.

मुंबई हे २४ तास कार्यरत असणारे शहर आहे. बेस्ट ही मुंबई मधील प्रमुख सार्वजनिक व्यवस्था म्हणजे बेस्ट आहे. मात्र, रात्रीच्या वेळी बेस्टची सेवा बंद असते. यामुळे उशिरापर्यंत काम करणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय होत आहे. तसेच त्यांना वाहतुकीसाठी इतर महागडे पर्याय शोधावे लागत असते. यामुळे बेस्टने मध्यरात्रीपासून ते पहाटे ५ पर्यंत विविध ६ मार्गांवर बेस्टतर्फे रात्रीही मुंबईकरांना यापुढे सेवा दिली जाणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रीक हाऊस, कुलाबा ते माहिम बसस्टँड, रुट क्रमांक ६६ इलेक्ट्रीक हाऊस ते शीव (Sion), रुट २०२- माहिम बस स्टँड ते पोईसर डेपो, रुट ३०२- शीव ते मुलुड पश्चिम, रुट ३०५- बॅकबे डेपो ते शीव आणि रुट ४४०-LTD - माहिम ते बोरीवली या मार्गांवर ही सेवा दिली जाणार आहे. हा मार्ग दोन्ही एअरपोर्टपासून जाणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT