Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha Saam Tv
मुंबई/पुणे

BEST Worker Protest News: बेस्टच्या कंत्राटी कर्मचारी संपामुळे नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही: मंत्री मंगलप्रभात लोढा

साम टिव्ही ब्युरो

BEST Worker Protest News:

मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

बेस्ट वाहतूक कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री लोढा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल उपस्थित होते.

मंत्री लोढा यांनी सांगितले की, मुंबईत ३०५२ बस नागरिकांच्या सेवेसाठी आहेत. त्यापैकी १,३८१ बस बेस्टच्या असून त्या सुरू आहेत. खासगी कंपन्यांद्वारे उर्वरित १,६७१ बस (वेट लीजवर) कंत्राटी पद्धतीने चालविण्यात येतात. जास्तीत जास्त बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी बेस्टकडून ९०० वाहनचालक दिले आहेत.

ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य परिवहनने (एमएसआरटीसीने) १८० पेक्षा अधिक बस दिल्या आहेत. तसेच, २०० पेक्षा जास्त खासगी बस सुरू करण्यात आल्या आहेत. अशा एकूण ३०५२ बसपैकी २६५१ बस नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्यक्षात सुरू असून, उर्वरित ४०० बस तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. (Latest Marathi News)

खासगी कंपन्यानी बस वाहन चालकांच्या किमान वेतनाची शाश्वती द्यावी, त्यांना आवश्यक सोयी सुविधा द्याव्यात, दिवाळी बोनस संदर्भातील प्रश्न सोडविण्यासंदर्भात कंपन्यांच्या मालकांसोबत चर्चा करण्यात आली असल्याचेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या ६ दिवसांपासून संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी ते आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. सरकारला मागण्यांबाबत अनेकदा पत्रव्यवहार केल्याचे कर्मचार्यांचे म्हणणे आहे. मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत असताना कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहत आहेत, असे सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RR vs PBKS: राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाबला मोठा धक्का! संघातील स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Nagpur Fraud Case : डुप्लिकेट कुलर बनवून व्यवस्थपकाने कंपनीची केली फसवणूक; मध्यप्रदेश, राजस्थानच्या विक्रेत्यांवरही गुन्हा दाखल

Lok Sabha Elections: इंडिया आघाडी 350 जागा जिंकणारा, काँग्रेसने पहिल्यांदाच केला मोठा दावा

Vastu Tips: घरामध्ये या दिशेला चुकूनही ठेवू नका डस्टबिन, संकटात याल

Anil Desai: मविआमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; प्रचार न करता माघारी फिरले अनिल देसाई

SCROLL FOR NEXT