Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur News : निवडणुकीच्या घोषणेआधीच बदलापूरला मोठी भेट, २४० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर, जीआर पण काढला

Badlapur Water Supply News : बदलापूर शहरासाठी २४० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी वामन म्हात्रे यांच्या हाती जीआर सुपूर्द केला असून या निर्णयाने शहरातील पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे.

Alisha Khedekar

बदलापूर शहरासाठी २४० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर

मंत्री गुलाबराव पाटील यांनी वामन म्हात्रे यांच्या हाती जीआर सुपूर्द

वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर उपाय

निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शासनाचा मोठा निर्णय

मयुरेश कडवं, बदलापूर

निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वी बदलापूर मधून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील पाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरासाठी २४० कोटींची पाण्याची योजना मंजूर केली आहे. त्याबाबतचा जीआर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या हाती सुपूर्द केला आहे. या घोषणेने बदलापूरकरांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

आज दुपारी ४ वाजता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्यानुसार निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बदलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला आहे. बदलापूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात पोहोचली असून वाढत्या लोकसंख्येनुसार शहराला पाणी टंचाई होत होती, त्यामुळे वाढीव पाणीपुरवठ्याची शहराला आवश्यकता आहे.

शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच पाणी मिळावं यासाठी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरासाठी २४० कोटींची योजना मंजूर केली आहे. त्यामुळे शहरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्याबाबतचा जीआर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या हाती सुपूर्द केला आहे. दरम्यान या घोषणेने बदलापूरकरांचा आनंद द्विगुणित झाला आहे. शहराचा घसा आता कोरडा राहणार नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर आता सगळ्यांचे लक्ष आज होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखांकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT