Shivsena Latest News  Saam Tv
मुंबई/पुणे

धनुष्यबाण गेला तर नवं चिन्ह घरोघरी पोहोचवण्याची तयारी ठेवा; उद्धव ठाकरेंचं आवाहन

Shivsena Latest News : शिवसेनेला जे काही नवे चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा" असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना आपल्या सोबत घेत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. या सर्व प्रक्रियेला न्यायालयाच्या पातळीवर त्यांना झालेली मदत पाहता शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हदेखील काढून घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. एकनाथ शिंदेंची वाढलेली ताकद पाहता आणि खचलेली शिवसेना पाहता शिवसेनेचे निवडणुकीसाठी वापरले जाणारे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण हे देखील शिवसेनेकडून हिसकावले जाऊ शकते. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता हे संकट झेलण्याचाही तयारी ठेवली आहे. (Politics For Shivsena Logo)

हे देखील पाहा -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, "कायद्याने जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवे चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा" असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना केले आहे. एकनाथ शिंदे गटाकडे सध्या मूळ शिवसेनेचे ४० आमदार तर इतर पक्ष आणि अपक्ष असे मिळून ५० आमदार आहेत. मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी आपला गट हीत खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. सोबतच शिवसेना पक्षाचं चिन्ह शिंदे गटाकडून हायजॅक करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीमुळे शिवसेनेत (Shivsena) फुट पडली आहे. तर शिंदे गटाने मुळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा करत शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाचे चिन्ह आपल्याला मिळावं अशी मागणी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी गद्दार हे गद्दार असतात, चिन्ह आणि पक्ष शिवसेनेसोबतच आहे, उद्धव ठाकरेंसोबतच (Uddhav Thackeray) आहे असं वक्तव्य केलं आहे. शिंदे गटातील आमदारांनी सेनेशी गद्दारी केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. बंडखोरांविरोधातील शिवसैनिकांच्या (Shivsainik) मनामध्ये असलेला रोष लक्षात घेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे ५० बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात "निष्ठा यात्रा" काढणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT