Baramati Assembly constituency gears up for a crucial by-election after the demise of Ajit Pawar, with Sunetra Pawar likely to contest from NCP. Saam Tv
मुंबई/पुणे

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार? सुनेत्रा पवारांच्या विरोधात कोण शड्डु ठोकणार?

Baramati Assembly By-Poll Announced: अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर झालीय... या निव़डणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित आहे.ही विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार का? बारामतीत नेमक्या काय हालचाली सुरु आहेत ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

बारामती..राज्याच्या राजकारणाचं एक केंद्रस्थान...तब्बल 35 वर्ष ज्या मतदारसंघावर अजित पवारांची एकहाती सत्ता होती, तिथे आता पहिल्यांदाच 'दादां'शिवाय निवडणूक होणार आहे.. अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलंय. अजितदादांच्या राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित आहे... मात्र, ही निवडणूकीत बिनविरोध होणार की विरोधक सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार उभा करणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलयं... अशातच मुख्यमंत्र्यांनी बारामतीची निवडणुक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केलीय... तर विरोधकांनी बिनविरोध म्हणता आणि मग उमेदवारी देता, असा टोला लगावलाय...

2024 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं युगेंद्र पवारांना बारामतीत अजित दादांविरोधात उमेदवारी दिली होती... मात्र यावेळी पोटनिवडणुकीत उमेदवारी देणार नसल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं स्पष्ट केलयं...शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जरी उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट केली असली तरी मविआतील इतर घटक पक्षांनी मात्र आपली भूमिका जाहीर केलेली नाही.त्यातच गेल्या तुलनेत या निवडणुकीत मतदार संख्याही वाढल्याचं समोर आलयं...

बारामती विधानसभेत तब्बल 3 लाख 83 हजार 767 मतदार असून त्यापैकी 1 लाख 93 हजार 496 पुरुष मतदार आहे... तर 1 लाख 90 हजार 271 महिला मतदार बारामतीत आहे... मात्र गेल्या 18 महिन्यात मतदार यादीत 23 हजार 159 हून अधिक नावांचा समावेश झालाय...सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यामुळे 6 महिन्याच्या आत विधिमंडळाचं सदस्य होणं अनिवार्य आहे...खरतर बारामतीच्या राजकारणात अजितदादांचा शब्दाला वेगळंच वजन होतं. अजितदादांच्या निधनानंतर बारामतीकरांनी आधीच सुनेत्रा पवारांना बारामतीचा वारसादार ठरवलयं... अशावेळी बारामतीची निवडणुक बिनविरोध होणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT