मुंबई/पुणे

Mumabi Crime : अवैध मार्गाने भारतात घुसलेल्या बांगलादेशी नागरिकास अटक, कांदिवली पोलिसांच्या एटीसी पथकाची कारवाई

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी मुंबई शहर आणि उपनगरात घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात तीव्र मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत कोंबिंग ऑपरेशन दरम्यान कांदिवलीच्या एकता नगर परिसरातून एक बांगलादेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात कांदिवली पोलिसांच्या एटीसी पथकाला यश आले आहे. तो मुंबईत सुतार काम करायचा आणि सध्या पोलिसांनी त्याला अटक करून कारागृहात पाठवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली परिसरातील एकता नगर भागात एक बांगलादेशी नागरिक येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार कांदिवली पोलिसांच्या कांदिवली पोलिसांच्या एटीसी पथकाने कांदिवली पोलिसांच्या (Police) एटीसी पथकानेएटीसी पथकाने एक तपास पथक तयार करून घाबऱ्याने दिलेल्या पत्त्यावर शोधण्यासाठी पाठवले.

सलग दोन-तीन दिवस त्याचा माग घेऊन पाठलाग करून खबऱ्याकडून इशारा होताच त्याला ताब्यात घेतले त्याची बोलीभाषा आणि संशयास्पद हालचालीवरून तो भारतीय नसल्याची खात्री झाली. त्याच्याकडे भारतीय त्वाचे पुरावे मागितले असता त्याने कोणतेही पुरावे दिले नाहीत त्याची कसून चौकशी केली असता तो बांगलादेशातून (Bangladesh) भारतात अवैध मार्गाने आणि बनावट कागदपत्रांचा आधार घेत कोलकत्ता मार्गे मुंबईत (Mumbai) आला असल्याची माहिती समोर आली.

कांदिवली पोलिसांच्या एटीसी पथकाने त्याच्याकडे भारतीयत्वाचे ओळख सिद्ध करणारे कागदपत्रे मागितले असता तो कोणतेच कागदपत्र देऊ शकला नाही. त्याने अवैध मार्गाने घुसखोरी केल्यामुळे कांदिवली पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhattisgarh Naxalite Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, नारायणपूरमध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा

Vishal Patil News | वंचितचं ठरलं! विशाल पाटलांना देणार साथ

Today's Marathi News Live : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात आकर्षक रोषणाई

Nilesh Lanke News | निलेश लंकेंचा पोलिसांवर सनसनाटी आरोप! कार्यकर्त्यांना कुणी धमकावलं?

Sharad Pawar यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT