pune crime news Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: खळबळजनक! पार्लरमधील नोकरीचं आमिष दाखवून बांगलादेशी अल्पवयीन मुलीची बुधवार पेठेत विक्री

Pune Crime News: अल्पवयीन मुलीला ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून कुंटणखान्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे

Pune Crime News In Marathi

विद्येच्या माहेरघरात धक्कादायक प्रकार घडला आहे. बांगलादेशातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून कुंटणखान्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला बेकायदेशीररित्या भारतात आणून पुण्यातील बुधवार पेठेतील कुंटखान्यात विक्री केल्याची खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या गुन्ह्यात दोन महिलांसह तिघांचा सामावेश असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

बांगलादेशातील तरुणी अल्पवयीन आहे. दलाल महिला मारिया उर्फ सोनी आणि एका नेपाळी पुरुषाने मुलीला पार्लरमध्ये काम देण्याचं आमिष दाखवलं. या मुलीला खोटे सांगून भारतात आणण्यासाठी तयार केलं. त्यानंतर दोघांनी या मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला बेकायदेशीररित्या भारतात आणले.

या अल्पवयीन मुलीला दोघांनी बुधवार पेठेत आणून कुंटणखाना चालवणाऱ्या डोलमा राजू तमांग या महिलेला विकलं. त्यानंतर या तरुणीला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. दरम्यान, फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT