नाशिकचे बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरण प्रकरणाची उकल करण्यात अखेर नाशिक पोलिसांना यश आलं आहे. २सप्टेंबरला नाशिकच्या इंदिरानगरमधून हेमंत पारख यांचं बंदुकीचा धाक दाखवून घरासमोरून बोलेरो पिकअपमधून अपहरण करण्यात आलं होतं.
अपहरणाची २ कोटींची रक्कम मिळताच त्यांना गुजरातमध्ये अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडून दिलं होत. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर या घटनेचा मास्टरमाईंड महेंद्र बिष्णोई पोलिसांच्या हाती लागला.
आरोपी महेंद्र बिष्णोईचा नाशिकच्या वाडीवरे परिसरामध्ये ढाबा आहे. तर दुसरा मुख्य आरोपी अनिल खराटे हा पारख यांच्या जमिनीच्या रखवालदाराचा मुलगा असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये एकूण ७ पैकी ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल २ महिन्यांपूर्वी पारख यांच्या अपहरणाचा डाव रचण्यात आला, तब्बल ७ दिवस रेकी करण्यात आली. त्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं. (Latest Marathi News)
आरोपींना खंडणीचे पैसे मिळताच सूरतजवळ पारख यांना आरोपींनी सोडून दिलं होतं. आरोपींनी उकळलेल्या २ कोटी रुपयांच्या खंडणीपैकी १ कोटी ४१ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. याप्रकरणी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यात फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. (Latest News on Crime)
दरम्यान आरोपी बिष्णोईवर राजस्थानमध्ये अमली पदार्थाचे २ गुन्हे दाखल असून आरोपी पिंटूसिंग राजपूतवर १७ गुन्हे, तर आरोपी अनिल खराटे यावर ४ गुन्हे दाखल आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पारख यांना सोडवण्यासाठी २ कोटींची रक्कम कुणी आणि कधी दिली, हे अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस सध्या याचा तपास करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.