कानून के हात लंबे होते है, असं म्हणतात. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये याची प्रचिती आली आहे. एका ७८ वर्षीय व्यक्ती ६० वर्षांपूर्वी केलेल्या चोरीच्या घटनेत अटक करण्यात आली आहे. गणपती विठ्ठल वागोरे असं या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपती वागोरे याच्यावर चोरीचा आरोप आहे. १९६५ मध्ये २० वर्षाचा असतानाचा चोरी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. कर्नाटकातील बीदर येथील मेहकर गावातून दोन म्हशी आणि एका वासराच्या चोरीचा आरोप त्याच्यावर होता. (Latest Marathi News)
गणपती याने २५ एप्रिल १९६५ रोजी ही चोरी केली होती. बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील मेहकर गावात ही चोरी झाली होती. वागोरे याने कृष्ण चंदर याच्या सोबतीने ही चोरी केली होती. (Crime News)
पोलिसांच्या माहितीनुसार, हे प्रकरण खूप जुने आहे. कर्नाटकातील बीदर जिल्हा हा महाराष्ट्राच्या सीमेलगत आहे. टाकळगाव गावात राहणाऱ्या गणपती याने ही चोरी केली होती. कृष्ण चंदर सहआरोपी होता जो १९६५मध्ये ३० वर्षांचा होता. त्याचं २००६ मध्ये त्यांचे निधन झाले.
बिदर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, चोरीचा आरोप असलेला गणपती वागोरे अनेक वर्षांपासून अटकेपासून दूर होता. मात्र आता त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहेत. चोरीच्या प्रकरणात जामिनावर सुटल्यावर तो फरार झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.