व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये भयंकर दुर्घटना घडली. ९ मजली टॉवरला भीषण आग लागून त्यात ५० रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाला. स्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली.
मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी रात्री ही भीषण आग लागली. इमारतीला आग लागली त्यावेळी बहुतांश रहिवासी हे घरीच होते.
एएनआयच्या वृत्तानुसार, व्हिएतनाम वृत्तसंस्थेने सांगितले की, स्थानिक वेळेनुसार रात्री दोन वाजता ही आग लागली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या ९ मजली इमारतीत १५० रहिवासी होते. (Latest Marathi News)
व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये ज्या इमारतीला आग लागली, ती शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी होती. त्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता. आगीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक यंत्रणांनी बचाव आणि मदतकार्य वेगाने हाती घेतले. त्यामुळे जवळपास ७० नागरिकांना वाचवण्यात यश आले. त्यातील ५४ नागरिकांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मीडिया रिपोर्टनुसार, इमारत गजबजलेल्या वस्तीत होती. त्यामुळे अग्निशमन यंत्रणेला बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. अग्निशमन बंब इमारतीपासून ३०० ते ४०० मीटरवर थांबवायला लागल्या.
इमारतीला आग का लागली, याचं कारण तात्काळ समजू शकले नाही. बुधवारी सकाळी ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन यंत्रणेला यश आले. बचावकार्य अद्याप सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही आग किती भयानक होती, हे वृत्तवाहिन्यांवरील दृश्यांमध्ये बघायला मिळाली. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. इमारतीतून आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही आग नेमकी कोणत्या कारणांमुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत.
दक्षिण व्हिएतनाममधील एका तीन मजली बारला मागील वर्षी भीषण आग लागली होती. त्या दुर्घटनेत ३२ जणांना जीव गमवावा लागला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.