bullock cart race , ambegoan saam tv
मुंबई/पुणे

Bullock Cart Race Ban : आयाेजकांनाे ! बैलगाडा शर्यतींवर आली बंदी; जाणून घ्या कारण

प्रशासनाने जनावरांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार, जत्रा, प्रदर्शन बैलांच्या शर्यती आयाेजित करण्यास पुढील आदेश हाेईपर्यंत प्रतिबंध घातले आहेत.

रोहिदास गाडगे

Bullock Cart Race Ban : लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव पुण्याच्या ग्रामीण भागात वाढत असल्याने आंबेगाव तहसिलदार रमा जोशी यांनी बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. त्याबाबतचे आदेश जाेशी यांनी नुकतेच काढले आहेत. या आदेशामुळं तात्पूरत्या स्वरुपात बैलगाडा शर्यतीवर निर्बंध आले आहेत.

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे आणि भोरवाडी येथे बैलगाडा घाटात भिर्रर्र चा थरार रंगणार होता मात्र लम्पी स्किन आजाराचे जनावरांमध्ये संक्रमण रोखण्यासाठी बैलगाडा शर्यती बंद करण्यात आल्यात. बैलगाडा शर्यतीसाठी पुणे जिल्ह्यातील गावागावातुन बैल एकत्र येत असतात. त्यातुन लम्पी स्किनचे संक्रमण होण्याचा धोका असल्याने प्रशासनाकडून तातडीने बैलगाडा शर्यत बंद करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे मोठ्या उत्साहात सुरु झालेल्या बैलगाडा शर्यतीला पुन्हा ब्रेक लागला.

गणेशाेत्सव (ganeshotsav) निमित्त भाेरवाडी (ता. आंबेगाव) येथे चार सप्टेंबरपर्यंत तसेच पुढील आदेश येईपर्यंत बैलगाडा शर्यत आयाेजित करु नये असेही तहसिलदार रमा जाेशी यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. याबराेबरच दहा किलाेमीटर परिसरातील बाधित व निगराणी घाेषित जनावरांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार, जत्रा, प्रदर्शन बैलांच्या शर्यती आयाेजित करण्यास पुढील आदेश हाेईपर्यंत प्रतिबंध घातले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मेहुणीने काढला भावोजीचा काटा, कानातलं सोन्याच्या पैसानं दिली सुपारी, कारण काय?

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Manoj Jarnage: बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मनोज जरांगेंचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा| VIDEO

Gold Price: 'या' १० कारणांमुळे सोनं होतेय स्वस्त; दिवाळीनंतर तब्बल ₹१०,३७० नी घसरण, आता गोल्ड खरेदी करणं योग्य?

Winter Lip Care: कोरड्या हवेमुळे ओठ काळे पडतायेत? जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT