mumbai goa highway, heavy vehicles, ganesh festival, ganesh utsav 2022 saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Goa Highway : 'या' तारेखपर्यंत मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; जाणून घ्या नवा आदेश

गणेशाेत्सवाच्या पार्श्वभुमीवर मुंबई गाेवा महामार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

Mumbai Goa Highway : गणेशोत्सव हा कोकणातील महत्व पूर्ण सण. या सणासाठी आपल्या आवडत्या बाप्पासाठी कोकणवासीय चाकरमानी आर्वजुन कोकणातील आपल्या घरी जातो. मुंबई ते कोकण या प्रवासादरम्यान या गणेशभक्त चाकरमान्यांच्या प्रवासात वाहतुक कोंडीचे विघ्न येऊ नये यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झालं आहे. या निमित्ताने गृह विभागाने एक आदेशा जारी करून गणेशोत्सव काळात कोकणात (kokan) जाणाऱ्या रस्त्यांवर जड अवजड वाहतुकीस निर्बंध लागु केले आहेत.

गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीसाठी आणि परतीच्या प्रवासासाठी येत्या 27 ऑगस्ट पासुन ते दहा सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत मुंबई- गोवा महामार्गावरून (mumbai goa highway) सर्व जड - अवजड वाहनांना वाहतुकीस पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. ज्यामध्ये ज्या वाहनांची वजनक्षमता १६ टन किवा १६ टनापेक्षा जास्त आहे अशी जड अवजड वाहनं, ज्यामध्ये ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर इत्यादी वाहनांवर ही बंदी लागु असेल.

या आदेशातून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळण्यात आलं आहे. हा आदेश गृह विभागाचे सचिव राजेंद्र होळकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बजेटला लागली कात्री

बदल्यांचा धडाका सुरूच! दोन IAS अधिकाऱ्यांची बदली

'मारू नका नं...! बायको रडत विनवण्या करत होती,पण...; ऊसतोड मजुराला बागायतदाराकडून काठीने बेदम मारहाण|Video Viral

Kalyan News : भाजप आणि शिंदे गटात दुरावा? सत्तेत असूनही मनोमिलन नाही, नेमकं कोणत्या पदावरून बिनसलं?

गॅस तुटवड्यावरून लोकसभेत वातावरण तापलं; देशात CNG, LPG गॅसची स्थिती काय? केंद्रीय मंत्री हरदीप पुरींनी सगळं सांगितलं

SCROLL FOR NEXT