Sanjay Raut claims Balasaheb Thackeray helped Narendra Modi and Amit Shah  
मुंबई/पुणे

Sanjay Raut : हिंदू असल्याचे विसरू नका, बाळासाहेबांनी अमित शाहांसाठी फोन फिरवला अन्...

Sanjay Raut Narakatil Swarg book : २००२ च्या गुजरात दंगलीच्या काळात नरेंद्र मोदी आणि खून प्रकरणात अमित शाह यांना शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांनी अडचणीतून बाहेर काढले. बाळासाहेबांच्या एका फोनमुळे अमित शाह यांना जामीन मिळाल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut claims Balasaheb Thackeray helped Narendra Modi and Amit Shah : संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामधील दाव्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी आणि खूनप्रकरणी अमित शाह यांच्यावर युपीए सरकारच्या काळात गंभीर आरोप होते. त्यांना अटक होणार होती. पण त्या काळात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दोघांना संकटातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असा दावा राऊतांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात मोठा खुलासा केला आहे. गुजरातमधून तडीपार झालेल्या शाहांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दोनदा प्रयत्न केले. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना बाळासाहेबांशी बोलता आले. शाहांनी हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगत असल्याचे सांगितले. बाळासाहेबांनी एका महत्त्वाच्या व्यक्तीशी फोनवरून संवाद साधत शाहांच्या अडचणी दूर केल्या. “तुम्ही कोणत्याही पदावर असाल, पण हिंदू असल्याचे विसरू नका,” असे बाळासाहेबांचे शेवटचे वाक्य होते, असे राऊत लिहितात.

राऊतांच्या मते, गुजरात दंगलीप्रकरणी मोदींना अटक होण्याची शक्यता होती. मात्र, शरद पवारांनी कॅबिनेट बैठकीत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणे अयोग्य असल्याचे मत मांडले. याला काही सहकाऱ्यांनी मूकसंमती दिल्याने मोदींची अटक टळली. त्याचप्रमाणे, अमित शाह यांच्यावर खूनप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू असताना बाळासाहेब ठाकरेंना विनंती केली. बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र कॅडरच्या एका सीबीआय अधिकाऱ्याशी संपर्क साधून शाहांना मदत केल्याचा दावा राऊतांनी केला.

आप बात करेंगे तो... शाह बाळासाहेबांना नेमकं काय म्हणाले ?

गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण व आपले कुटुंब भोगत असल्याचे अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरेंना सांगितले. "मी अडचणीत आहे, अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे, तडीपारी आहे वगैरे..." असे अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं. त्यानंतर अमित शाह बाळासाहेब यांना म्हणाले." आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे...तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत" त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी संबंधित व्यक्तीला थेट फोन केला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे अमित शाह यांना म्हणाले की, "तुम्ही कोणतेही पदावर बसलेले असा पण तुम्ही ही हिंदू आहात हे विसरू नका." पण त्यानंतर अमित शाहा यांनी पुढे काय केलं हे साऱ्यांनी पाहिलं. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी ते निर्घृणपणे वागल्याचे या पुस्तकातून संजय राऊत यांनी सांगितलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT