Pune News, Bakri Eid  saam tv
मुंबई/पुणे

Pune Traffic Diverted : पुणेकरांनाे ! ईदच्या पार्श्वभूमीवर उद्या वाहतूकीत माेठा बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणार्‍या सर्व जड मालवाहतूक वाहने, जड प्रवासी बस, प्रवासी एसटी बसेस, पीएमटी बसेस यांना प्रवेश बंद करण्यात येईल.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune Traffic Updates : ईदच्या पार्श्वभूमीवर गोळीबार मैदान चौक येथील ईदगाह येथे नमाज पठणाचा (golibar maidan chowk namaz padhna) कार्यक्रम उद्या (गुरुवार) सकाळी सहा वाजता होणार आहे. त्या ठिकाणी नमाज पठण पूर्ण होईपर्यंत मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक, सेव्हन लव्हज चौक परिसरातील वाहतूक बंद केली जाणार आहे अशी माहिती पाेलिस दलाने दिली. (Maharashtra News)

असा असेल वाहतूक बदल

सोलापूर रस्त्याने मम्मादेवी चौक येथून गोळीबार चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग- मम्मादेवी चौक बिशप स्कूल मार्गे किंवा कमांड हॉस्पिटलमार्गे वाहन चालकांनी जावे.

गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा नमाज पठणाच्या वेळी वाहतुकीसाठी बंद राहील. पर्यायी मार्ग- गोळीबार चौकातून डाव्या बाजूस वळून सीडीओ चौक पुढे उजवीकडे वळून गिरीधर भवन चौक, सेव्हन लव्हज चौकातून जावे.

सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग- सॅलिसबरी पार्क सीडीओ चौक भैरोबानाला येथून जातील.

भैरोबानालाकडून गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथून वळविण्यात येणार आहे. ही वाहने एम्प्रेस गार्डन व लुल्लानगरकडे जातील. पर्यायी मार्ग- प्रिन्स ऑफ वेल्स रस्त्याने डने किंवा भैरोबानाला वानवडी बाजार चौक येथून इच्छित स्थळी जातील.

कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणार्‍या सर्व जड मालवाहतूक वाहने, जड प्रवासी बस, प्रवासी एसटी बसेस, पीएमटी बसेस यांना प्रवेश बंद करण्यात येईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT