Kalyan Durgadi Fort Shivsena Protest:  
मुंबई/पुणे

Kalyan Durgadi Fort: दुर्गाडी किल्ल्यावर मुस्लीम बांधवांची नमाज! शिवसेना शिंदे गट- ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन; कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

Kalyan Durgadi Fort Shivsena Protest: शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्यावर घंटानाद आंदोलन केले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली १९८६ सालापासून शिवसेनेने हे घंटानाद आंदोलन सुरु केले होते. जाणून घ्या आंदोलनाचा इतिहास

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, कल्याण|ता. १७ जून २०२४

कल्याणच्या दुर्गाडी किल्ला भागात असलेल्या मशिदीत मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा केली. यानंतर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेर घंटनाद आंदोलन केले. जोपर्यंत मंदिरात प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लीम या दोन्ही समाजाची धार्मिक स्थळे आहेत. बकरी ईद निमित्त दोन धर्मामध्ये कोणतेही वाद होऊ नये यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळी मुस्लीम बांधव नमाज पठण करत असताना  पोलिसांकडून हिंदु बांधवांना सकाळी दुर्गाडी किल्ल्यावर आरती व घंटानादकरण्याकरिता  प्रवेश बंदी केली जाते.

या बंदीविरोधात आज शिवसेना शिंदे गट तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. टिळक चौकातून या आंदोलनाला सुरूवात झाली. आंदोलनावेळी शिवसेना ठाकरे गट तसेच शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने- सामने आल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली तसेच कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली १९८६ सालापासून शिवसेनेने हे घंटानाद आंदोलन सुरु केले. तेव्हापासून दरवर्षी बकरी ईद निमित्त कल्याण मध्ये  शिवसैनिक घंटानाद आंदोलन करतात. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षी शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट दोघांनी वेगवेगळे आंदोलन याच ठिकाणी केली होती. लाल चौकी परिसरात आंदोलकांना अडवले जातात त्यानंतर या ठिकाणी आरती केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT