Bulli Bai App News Updates, Mumbai Latest News Updates  Saam Tv
मुंबई/पुणे

बुली बाई अ‍ॅप प्रकरणातील 3 आरोपींना जामीन

बुली बाई अ‍ॅप (Bulli Bai App) प्रकरणातील ३ आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बुली बाई अ‍ॅप (Bulli Bai App) प्रकरणातील ३ आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या ३ विद्यार्थ्यांचा जामीन मंजूर करत असताना न्यायालयाने सांगितले आहे की, या तरुण आरोपींच्या अजाणतेपणा दुरुपयोग इतर आरोपींकडून (accused) करण्यात आला. वांद्रे न्यायालयाचे (court) न्यायाधीश के. सी. राजपूत यांनी १२ एप्रिल दिवशी आरोपी विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक अग्रवाल यांचा जामीन मंजूर केला आहे. तर आरोपी नीरज बिश्नोई, ओंकारेश्वर ठाकूर आणि नीरज सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. (Bulli Bai App News Updates)

हे देखील पहा-

या विषयी सविस्तर आदेश मंगळवारी उपलब्ध करून देण्यात आला. न्यायालयाने जामिनावर सुटलेल्या आरोपींच्या पालकांना शक्य असल्यास त्यांच्या मुलांना सामाजिक वर्तन आणि सोशल मीडियाचा (Social media) योग्य वापराचे नियम शिकवण्यासाठी समुपदेशन करण्यास सांगितले आहे. या अगोदर मॅजिस्ट्रेट कोर्ट आणि सेशन कोर्टाने या सर्वांना जामीन नाकारला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपींनी नव्याने याचिका दाखल करण्यात आली होती. आरोपी नीरज बिश्नोई, ओंकारेश्वर ठाकूर आणि नीरज सिंह यांनी हे प्रकरणातील मुख्य सुत्रधार आहेत. त्यांनी अ‍ॅप तयार करणे आणि अपलोड करणे आणि माहिती प्रसरवण्याचे काम केले होते, असे कोर्टाने सांगितले आहे.

कोर्टाने सांगितले की, आरोपी विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक अग्रवाल हे तरुण आरोपींनी इतर आरोपींचे अनुसरण करत होते. यामुळे याप्रकरणात विशाल, श्वेता आणि मयंक यांची भूमिका बिश्नोई, ठाकूर आणि नीरज सिंह यांच्यापेक्षा कमी असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, बिश्नोई, ठाकूर आणि नीरज हे वयाने प्रौढ असून त्यांना समज देण्यात आली होती. तरी देखील त्यांनी ३ तरुणांच्या अज्ञानाचा गैरवापर केला. विशाल, श्वेता आणि मयंक यांच्या परीक्षाजवळ आल्या असून त्यांना तुरुंगात ठेवल्यास त्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होणार आहे, असे न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे तिघांवर लावण्यात आलेले आरोप आणि त्यांचे वय लक्षात घेता त्यांची भूमिका कमी गंभीर असल्याने ते जामिनावर सुटण्यास पात्र आहेत.

काय आहे प्रकरण?

पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बुली बाई' अ‍ॅप्लिकेशनवर जवळपास १०० प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. ज्यामध्ये काही पत्रकार महिला आणि त्यांचे फोटो देखील अपलोड करण्यात आले होते. तसेच त्यांची बोली देखील लावली जात होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेलने ट्विटरला लिहिलं होतं. कारण 'बुली बाई'शी संबंधित ३ ट्विटर हँडलची माहिती पोलिसांना मिळाली. या अ‍ॅप्लिकेशनची तक्रार आल्यानंतर मुंबई पोलिसांनी 'बुली बाई' अ‍ॅप्लिकेशन तयार करणाऱ्या डोमेन गुगलला पत्र लिहून हे अ‍ॅप्लिकेशन बंद करण्याचे निर्देश दिले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coriander Benefits: हाय बीपी आणि डायबिटीजसाठी वरदान ठरेल तुमच्या किचनमधील 'ही' एक गोष्ट

Maharashtra Politics : ठाकरे गटात मोठा राडा; शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुखांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?

Investment Tips: फक्त १० हजार रुपयांची बचत तुम्हाला बनवेल करोडपती; समजून घ्या गणित

Chanakya Niti : आयुष्यात एकदातरी प्रेमात पडलेल्यांनी नक्की वाचा 'या' सिक्रेट टिप्स

Maharashtra Live News Update : उपसभापती हरिवंश सिंह यांनी भूषवलं राज्यसभेचं सभापतिपद

SCROLL FOR NEXT