सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी जामिनावर आज सुनावणी

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११५ एसटी कर्मचाऱ्यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाचे (court) दरवाजे ठोठावले
silver oak st protest
silver oak st protest Saam Tv
Published On

मुंबई: सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११५ एसटी कर्मचाऱ्यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाचे (court) दरवाजे ठोठावले आहेत. यामध्ये २४ महिलांचा समावेश असून या सर्व आंदोलकांना, आर्थर रोड, तळोजा, भायखळा अश्या विविध कारागृहात (prison) जागेच्या उपलब्धतेनुसार ठेवण्यात आले आहे. या सर्वांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. यापैकी बरेच जण हे मुंबई (Mumbai) बाहेरून आले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांकडे जामीनाची अनामत रक्कम भरण्यासाठी देखील पैसे नाहीत, हमीदार नाही अशी त्यांची बिकट अवस्था असल्याचे त्यांच्या जामीन अर्जात नमूद केले आहे.

हे देखील पहा-

सिल्व्हर ओकवरील (Silver Oak) आंदोलन प्रकरणी येत्या २९ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना (police) जारी करण्यात आले आहेत. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देऊ नये, अशी भूमिका घेत राज्य सरकारच्यावतीने जयश्री पाटील यांच्या याचिकेला राज्य सरकारने जोरदार विरोध केला होता. मात्र, FIR मध्ये त्यांचे अद्याप नाव टाकले नाही. तिसऱ्या रीमांडला पाटील यांच्या सहभागाचा उल्लेख झाला आहे. तसेच FIR क्रमांकांमध्ये काही तांत्रिक दोष असल्याच्या मुद्यावर कोर्टाने त्यांना अंतरिम दिलासा मंजूर केला आहे.

silver oak st protest
एक एकरात तब्बल 25 क्विंटल कांद्याचे उत्पादन, पहा पठ्ठ्याची कमाल

प्रकरण काय आहे

राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी ८ एप्रिल दिवशी दुपारच्यावेळी अचानकपणे शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या दिशेने चपला भरकावल्या तर महिला आंदोलकांनी बांगड्या फोडत पवार कुटुंबियांविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली होती. साधारण तासाभराच्या प्रयत्नांनंतर पोलीसांनाी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. याप्रकरणी गावदेवी पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे. सदावर्ते यांच्या वकिलांना या संदर्भात माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांचा ताबा गावदेवी पोलिसांकडे जाणार की कोल्हापूर पोलिसांकडे याचा निर्णय होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com