रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांची दहशत आता इतकी वाढलीय की बदलापुरमध्ये एका 18 वर्षाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. भटक्या कुत्र्याचा पाठलाग चुकवण्यासाठी धावणाऱ्या हर्षल शिंदेेचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय. हर्षल बदलापूर पश्चिमेच्या शनीनगर परिसरात मित्रांना सोडण्यासाठी गेला होता. याचवेळी एक महिला भटक्या कुत्र्यांना तिथे खायला घालत होती.यावेळी तिथलाच एक भटका कुत्रा हर्षल आणि त्याच्या मित्राच्या मागे लागला. कुत्र्यापासून वाचण्यासाठी हर्षलनं जीवाच्या आकांताने पळ काढला आणि परिसरातील एका दुकानात आश्रय घेतला. मात्र, जोरात पळाल्यानं त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला...
या धक्कादायक प्रकारानं भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ही घटना घडल्यानंतर जाग आलेल्या पालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचं बंदोबस्त करण्याच आश्वासन दिलंय.
बदलापूर सारख्या शहरातलीच भटक्या कुत्र्यांची संख्या सध्या 15 हजारावर गेलीय. राज्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्यानं घडतायत... लहान मुलांवरील कुत्र्यांचा हल्ला हा तर नेहमीचाच विषय झालाय..तरीही याकडे कुणी गांभीर्यान पाहात असताना दिसत नाहीय.या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खरोखरच राज्य पातळीवर ठोस उपाययोजना होणार की सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी सुरु असलेला हा खेळ असाच सुरुच राहणार?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.