Tushar Apte Saam
मुंबई/पुणे

Tushar Apte : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा स्वीकृत नगरसेवक

Badlapur rape case, Tushar Apte : बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांची भाजपने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली.

Namdeo Kumbhar

Who is Tushar Apte, an corporator : बदलापुरातील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीची भाजपने स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती केलीय.. आरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवकपद दिल्याने नवा वाद निर्माण झालाय. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळ आणि लोकवर्गामध्ये संताप उभा राहिला आहे. या निर्णयामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. नागरिक आणि विरोधकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

(Badlapur rape case co-accused appointed as BJP corporator)

अक्षय शिंदेच्या चौकशीनंतर शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर सूत्रांच्या माहितीनुसार, नगरपालिका निवडणुकीत तुषार आपटे यांनी भाजपसाठी मोठा प्रचार केला आणि त्याचे बक्षीस म्हणून स्वीकृत नगरसेवकपद दिले गेले. मात्र या निर्णयामुळे भाजपच्या प्रतिमेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले शाळेचे सचिव तुषार आपटे यांची भाजपने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केलीय. बदलापूरमधील एका नामवंत शाळेत ऑगस्ट 2024 मध्ये सफाई कर्मचाऱ्याने 4 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. वैद्यकीय अहवालात एका मुलीच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याचं समोर आलं. त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी त्या पीडित मुलीचे कुटुंबीय अहवाल घेऊन शाळेत गेले, मात्र शाळेने सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी 11 तासानंतर शाळेचा सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या एनकाऊन्टरमध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर बदलापूर शहरात मोठं जन आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर शाळेच्या विश्वस्तांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तुषार आपटे या शाळेचे सचिव आहेत. त्यांनाच आता भाजपने स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्त केलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT