Police Lathi Charge On Protester 
मुंबई/पुणे

Badlapur Protest: कार उलटवली, काचा फोडल्या; पोलिसांच्या लाठीमारनंतर आंदोलकांकडून वाहनांची तोडफोड

Police Lathi Charge On Protester: बदलापूरमध्ये आंदोलनक आणि पोलिस आमने सामने आले आहेत. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर वाहनांची तोडफो केलीय.

Bharat Jadhav

बदलापूरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण आले असून पोलिसांच्या लाठीमारनंतर आंदोलक संतापले आहेत. लाठीचार्जनंतर आंदोलकांनी वाहानांवर आपला राग काढला असून अनेक वाहनांची तोडफोड केलीय. पोलिसांच्या वाहनासह इतर प्रवाशांच्या कारच्या काचा फोडल्या.

आंदोलक आणि पोलिस आमने सामने आले आहेत. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. सध्या बदलापूरमध्ये तणावाचे वातावरण आहे. गेल्या सात तासांपासून बदलापूरमध्ये रेलरोको आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मंत्री गिरीष महाजन यांनी आंदोलनकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिले. गेल्या सात ते आठ तासापासून आंदोलकांनी बदलापूर रेल्वे मार्ग अडवून ठेवला होता.

रेल्वे मार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांना अखेर लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी आंदोलकांना वेढा घालत लाठीमार सुरू केला. त्यानंतर आंदोलक अम्बरनाथ आणि वांगणी स्टेशनकडे गेले. त्यानंतर काही वेळानंतर एसटी बस आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. रेल्ले स्थानकाजवळील वाहनांचे नुकसान केले.

सात तासांपासून बदलापूरमध्ये रेलरोको आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिले. जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीमार केला.

बदलापुरच्या नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूर बंदसोबत आंदोलन करण्यात आलं होतं. गेल्या ८ तासांपासून बदलापूरमध्ये आंदोलन सुरू आहे. तर ७ तासांपासून आंदोलनकांनी बदलापूर रेल्वे स्थानाकावर मोठ्यासंख्येने एकत्र येत रेलरोको आंदोलन केले. रेल्वे रुळावर उतरून नागरिकांनी रेलरोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे मध्यरेल्वेची वाहतूक कोलमडली होती. सकाळपासून अंबरनाथ ते कर्जत रेल्वे वाहतूक ठप्प झाली. तब्बल ११ तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान पोलिसांनी आणि मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळावरील आंदोलनकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिले. त्यानंतर सरकारच्या वतीने गिरीश महाजन यांनी देखील आंदोलनकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिलेत. शेवटी पोलिसांनी मोठ्यासंख्येने येत आंदोलकांवर लाठीमार केला. पोलिसांनी बळाचा वापर करत जमावाला पसरवले. दरम्यान पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी वाहनांची तोडफोड केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

SCROLL FOR NEXT