Badlapur News Saam Digital
मुंबई/पुणे

Badlapur News : आई-वडिलांकडून मुलीचा छळ; तरुणीने मारली उल्हास नदीत उडी, 'जलपर्णी' धावून आली मदतीला

Badlapur News : आई-वडिलांकडूनच होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून एका तरुणीने उल्हास नदीत उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीत जलपर्णी या तरुणीच्या मदतीला धावून आली आहे.

Sandeep Gawade

Badlapur News

आई-वडिलांकडूनच होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून एका तरुणीने उल्हास नदीत उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीत जलपर्णी या तरुणीच्या मदतीला धावून आली आहे. नदीत उडी टाकल्यानंतरही तरुणी जलपर्णीत अडकून पडली होती. त्यामुळे अग्निशमन दलाला या तरुणीला वाचवण्यात यश आलं आहे. तरुणीवर बदलापूर मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करायची नाही, कुठेही जायचं नाही, कोणाशी बोलायच नाही. आई वडिलांकडून येणाऱ्या या सततच्या शब्दांमुळे बदलापूर ग्रामीण पट्ट्यात राहणाऱ्या या १८ वर्षीय तरुणीने अखेर टोकाचं पाऊल उचललं. मृत्यूला कवटाळण्याचा प्रयत्न करत तिने उल्हास नदीत उडी टाकून जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणी नदीत वाढलेल्या जलपर्णीत उडकून पडली. याची माहिती मिळताच अग्निशमनदलाचा पाचारण करण्यात आलं आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्या तरुणीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. आता तरुणी सुरक्षित असून तिच्यावर बदलापूर मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगार गजाआड

बेकायदेशीरित्या विनापरवाना विदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राम उर्फ शिवा कनोजिया असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या विरोधात याआधी देखील मानपाडा, डोंबिवली ,पनवेल, टिटवाळा पोलीस स्टेशन येथे पिस्तूल बाळगणे आणि पिस्तूल खरेदी विक्री करण्याप्रकरणी सहा गुन्हे दाखल आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Side Effects: रात्री चपाती खाल्ल्याने उद्भवतात 'या' समस्या, वेळीच घ्या काळजी

Fish : बुद्धिमान आणि सुंदर असतो हा पाण्यातील मासा, ९९% लोकांना नसेल माहिती

Shivsena: '५० खोक्यांमधील आज १ खोका दिसला' संजय शिरसाटांच्या बेडवरूममधील व्हिडिओवर शिवसेनेच्या आमदाराचा हल्लाबोल

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची शाळांची दयनीय अवस्था

Health Insurance: आता २४ तास अ‍ॅडमिड होण्याची गरज नाही; केवळ २ तास रूग्णालयात राहूनही मिळणार क्लेम

SCROLL FOR NEXT