Badlapur Fire News
Badlapur Fire News Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Fire : बदलापुरात इमारतीला भीषण आग; घरातील साहित्य जळून खाक

अजय दुधाणे

Badlapur Fire Update :

बदलापुरातील शिरगावमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीला शनिवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या तळमजल्यावरील घराला आग लागली. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या शिरगाव परिसरात वेदांत वाटिका या इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या इमारतीच्या एका घराला भीषण आग लागली होती. घराला लागलेल्या आगीत घर पूर्णपणे जळून खाक झाले.

या इमारतीच्या तळमजल्यावरील घरात आग लागली. त्यामुळे या घराच्या वरच्या मजल्यावरील दोन घरांना आगीची झळ पोहोचली आहे. आग लागल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने इमारत तातडीने रिकामी करण्यात आली होती.

आग लागल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. घरात कोणीही नसल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत घराचं मोठं नुकसान झालं. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

येरवाड्यात लाकडी साहित्याला भीषण आग

पुण्यातील येरवडयात लाकडी साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली. पुण्यातील येरवडयात बालाजीनगर येथे लाकडी साहित्याच्या गोडाऊनला शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.

घटनास्थळी अग्निशमनदलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. या आगीत गोडाऊनमधील लाकडी साहित्य संपूर्ण पेटले. या आगीमुळे गोडाऊनमधील साहित्याचे मोठं नुकसान झालं आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Video: 48 पैकी 49 जागाही Uddhav Thackeray जिंकून आणू शकतात! देवेंद्र फडणवीसांच्या विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ

Akola Accident: देव तारी त्याला कोण मारी! ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारमधील सर्वजण सुखरुप

Devendra Fadnavis: भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट का कापले? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT