Badlapur Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Badlapur Crime: बदलापूर पुन्हा हादरलं! 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेला अमानुष मारहाण

Badlapur Sexual Abuse Crime News Updates: बदलापूर येथे पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना घडली असून एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला.

Satish Daud

Badlapur Crime Update: बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. आरोपीला तातडीने फासावर लटकवा, अशी मागणी अनेकांनी केली. यासाठी मोठं आंदोलनही करण्यात आलं. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बदलापुरात लैंगिक अत्याचाराची घटना घडली.

एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच अनेकदा लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही तर तिला अमानुष मारहाण देखील केली. ही संतापजनक घटना 22 ऑगस्ट रोजी घडली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलंय. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित मुलगी आपल्या आईसह बदलापूरमधील (Badlapur News) एका परिसरात राहते.

तिची आई एका कंपनीत कामाला असून रात्री उशीरा घरी येते. 22 ऑगस्टच्या रोजी पीडिता अचानक घर सोडून पळून गेली होती. शोध घेऊनही थांगपत्ता न लागल्याने पीडितेच्या आईने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी (Police) शोध सुरू करण्याआधीच पीडिता पुन्हा घरी आली.

आईने तिला विचारणा केली असता, 22 ऑगस्टच्या रात्री वडिलांनी मारहाण करत माझ्यावर लैंगिक अत्याचार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असं पीडितेने सांगितले. मुलीवर अत्याचार झाल्याचे कळताच आईने तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT