badlapur  Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Crime : बायकोवर अतिप्रसंग, संतापलेल्या नवऱ्याने मित्राला संपवलं; असा झाला हत्येचा उलगडा

Badlapur Crime News : नराधमाने मित्राच्या बायकोवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली. या प्रकारानंतर नवऱ्याने मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने बदलापुरात खळबळ उडाली आहे.

Mayuresh Kadav

बदलापुरात एका नराधमाने त्याच्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केला. तसंच ही बाब पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र हे वारंवार घडू लागल्यानंतर पत्नीने पतीला याबाबतची माहिती दिली. यानंतर पतीने त्याच्या मित्राची डोक्यात हातोडी घालून हत्या केली. त्याची हत्या केल्यानंतर बाथरूममध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या सगळ्याची पोलखोल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती. मात्र सुशांत याने नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग करत पतीला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आणखी काही वेळा त्याने तिला धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला. मात्र पत्नीने हिंमत करून नरेश याला सुशांतच्या या दुष्कृत्याची माहिती दिली.

नरेशने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं दाखवत 10 जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलावलं. तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केलं. त्या रात्री सुशांत हा नरेशच्याच घरी मुक्कामी राहिला. पहाटेच्या सुमारास नरेश याने सुशांतच्या डोक्यात हातोडी मारून त्याची हत्या केली आणि अति दारू प्यायल्याने बाथरूममध्ये पडून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला, असा बनाव रचत पोलिसांना माहिती दिली.

याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र ज्यावेळेस सुशांत याच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले, त्यावेळेस नरेश याची पोलखोल झाली. कारण सुशांतचा मृत्यू अवजड वस्तूने डोक्यात प्रहार केल्यामुळे झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. यानंतर पोलिसांनी नरेश याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सुशांत याची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. आपल्या पत्नीसोबत दुष्कृत्य केल्याच्या रागातून त्याने सुशांतला मारल्याचं पोलिसांना सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Mumbai E Water Taxi : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गेटवे ते जेएनपीए ‘ई वॉटर टॅक्सी’ २२ सप्टेंबरपासून धावणार

Mumbai Local: गुड न्यूज! मुंबई लोकलला ‘वंदे मेट्रो’चा लूक, एसी लोकल होणार १८ डब्यांची; कसा आहे रेल्वेचा प्लान?

Navratri 2025: यंदा नवरात्र उत्सव कधीपासून आहे? तारीख अन् मुहूर्त जाणून घ्या

Gold Rate: सणासुदीत सोनं १ तोळ्यामागे २० हजारांनी वाढणार, वाचा तज्ज्ञांनी का वर्तवला अंदाज

SCROLL FOR NEXT