Shocking Twist in Badlapur Womans Death Case Saam
मुंबई/पुणे

बदलापूर हादरलं! ३ वर्षांनंतर महिलेच्या मृत्यूचं गूढ उकललं; नवऱ्यानंच आखलेला कट, स्टोरी एखाद्या क्राइम स्टोरीसारखी...

Shocking Twist in Badlapur Womans Death Case: घरगुती वादातून महिलेची हत्या. नवऱ्यानं बायकोच्या अंगावर साप सोडला. बायकोचा मृत्यू. तब्बल ३ वर्षांनंतर महिलेच्या मृत्यूमागचं गूढ उकललं.

Bhagyashree Kamble

बदलापुरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. तब्बल तीन वर्षांनंतर एका महिलेच्या मृत्यू मागचं गूढ उकललं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह चौघांना अटक केली आहे. या सर्वांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिलेचा मृत्यू नैसर्गिक कारणाने नसून विषारी साप चावल्याने झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

रिपोर्ट्सनुसार, नीरजा रूपेश आंबेकर असं मृत महिलेचं नाव आहे. १० जुलै २०२२ रोजी बदलापूर पूर्वेकडील उज्ज्वलदीप सोसायटी येथील घरात महिलेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अपघाती मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरूवातीच्या तपासात कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती सापडला नाही. परंतु, नंतर काही साक्षीदारांच्या जबाबामुळे पोलिसांना संशय येऊ लागला. यामुळे पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला.

तपासात असे दिसून आले की, मृत महिलेचं पती (रूपेश आंबेकर)सोबत वारंवार घरगुती कारणावरून वाद सुरू होते. याच वादांमुळे त्यानं पत्नीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याचे मित्र ऋषिकेश रमेश चाळके आणि कुणाल विश्वनाथ चौधरी या कटात सामील होते. आरोपींनी आधी चेतन दुधाणे नावाच्या सर्प बचाव स्वयंसेवकाशी संपर्क साधला होता. त्याने आरोपींना साप दिला. नीरजा हिला त्याच सापाने चावा घेतला.

सापाने चावा घेतल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. ही बाब पोलीस तपास आणि तांत्रिक तपासात उघड झाले. तब्बल तीन वर्षांनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT