बदलापूर : येथे गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून चोरीचा (ATM Robbery) प्रयत्न करण्यात आलाय. चोरट्यांचा हा डाव एका सलून चालकाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला असून पोलिसांनी याप्रकरणी (Two thief arrested) दोन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. दीप भगवान शिंदे (२०) आणि वेदांत विलास चिरमुले (१८) अशी आरोपींची नावं आहेत. आरोपी भांडुपचे रहिवासी असून शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता ते चोरी करण्याच्या उद्देशाने बदलापूरला आले होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बदलापूर पश्चिमेच्या बेलवली परिसरातील जाधव कॉलनी भागात कॅनरा बँकेचं एटीएम आहे. या एटीएममध्ये उस्मान शेख हा सलून चालक काल रात्री दीड वाजताच्या सुमारास पैसे काढण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला एक तरुण एटीएमच्या बाहेर उभा असलेला, तर एक तरुण एटीएमच्या आतमध्ये मशीन तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसलं. त्यामुळं त्यानं या दोघांना हटकलं असता ते दोघेही तिथून पळून जाऊ लागले. त्यामुळं उस्मान याने त्यांचा पाठलाग करत 'चोर.. चोर..' असं ओरडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिथून जात असलेल्या बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या २ बीट मार्शल्सना हा प्रकार दिसला.
त्यांनी पाठलाग करत या दोघांना पकडलं असता त्यांच्याकडे गॅस कटरसह दरोडा टाकण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य आढळून आलं. त्यामुळं त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता, त्यांनी आपण एटीएम कापून पैसे चोरी करत असल्याची कबुली पोलिसांना दिली. सं हे दोयानंतर त्यांनी रेकी करून बेलवलीतल्या या कॅनरा बँकेच्या एटीएमची निवड केली आणि मध्यरात्री तिथे दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र सलून चालक उस्मान शेख याच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव उधळला गेल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली आहे.
दरम्यान, या दोघांपैकी आरोपी संदीप शिंदे याने भांडुपमध्ये मोबाईलचं दुकान टाकलं होतं. मात्र हे दुकान न चालल्यानं तो कर्जबाजारी झाला होता. यातूनच आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी झटपट पैसे मिळवण्याच्या हेतूने त्यांनी हा मार्ग निवडल्याचं पोलिसांनी सांगितलं. या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांनी यापूर्वी असे काही प्रकार केले आहेत का? याचा तपास केला जाणार असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली आहे. आर्थिक विवंचना सगळ्यांनाच असते, पण चोरी हा त्यावरचा उपाय नसल्याचं मत पोलिसांनी व्यक्त केलंय.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.