Badlapur News Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur : बदलापूरमध्ये ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा; पुढील १० दिवस सुरु राहणार कारवाई

Badlapur News : बदलापूर नगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ४००हून अधिक अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. पुढील काही दिवस धडक मोहीम सुरू राहणार आहे.

Mayuresh Kadav, Alisha Khedekar

  • बदलापूर नगरपालिकेची अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी मोहीम

  • ४००हून अधिक बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

  • अंबरनाथ-बदलापूर व पनवेल हायवे लगत कारवाई

  • मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार कारवाई

मयुरेश कडव, बदलापूर

कल्याण डोंबिवली नंतर बदलापूरमध्ये देखील नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर छोट्या व्यवसायिकांचे नुकसान झाले असून नागरिकांनी पालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दि २ फेब्रुवारी रोजी बदलापूर नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या बांधकामांबाबत अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला आदेश दिले होते.

त्यानुसार नगरपालिकेनं शहरातील ४०० हून अधिक अनाधिकृत बांधकामांची यादी तयार करण्यात आली. पालिकेमार्फत अंबरनाथ-बदलापूर हायवे तसेच पनवेल हायवे लगतची अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहे.

पुढील आठ ते दहा दिवस ही कारवाई सुरू राहणार असून शहरातील ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामं हटवण्यात येतील अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे. गेल्या काही वर्षात बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. यात व्यावसायिक दुकानांचं प्रमाण सर्वाधिक आहे. दरम्यान बदलापूर मधल्या नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केल आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : रात्रीच्या जेवणाला खा 'हा' पदार्थ, वजन होईल कमी अन् चवही लागले भारी

Maharashtra News Live Update: बारामती सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो

लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी महिलांकडे केली शरीरसुखाची मागणी; महाराष्ट्रात संतापाची लाट

म्हाडाच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार; मुंबईसह महाराष्ट्रात १३०१२ घरे बांधणार

Crime News: आईचे ६५ वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत अनैतिक संबंध, अडथळा ठरणाऱ्या मुलाची हत्या; २५ हजारांत दिली सुपारी

SCROLL FOR NEXT