Dead fly and foil piece found inside pav bought from a bakery in Badlapur’s Kharvai area; serious food safety concern raised by locals. Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Badlapur : बेकरीतला पाव खाताय, सावधान ! पावात सापडली मेलेली माशी आणि फॉईल पेपर

Pav with insect and foil : बदलापूरमध्ये पावामध्ये माशी व फॉईल पेपर सापडल्याने खळबळ, ग्राहकांच्या आरोग्याला धोका. बेकरी चालकांविरोधात कडक कारवाईची मागणी होत आहे.

Namdeo Kumbhar

मयुरेश कडव, बदलापूर प्रतिनिधी

Bakery in Badlapur under fire for poor hygiene and contaminated food : तुम्ही जर बेकरीतून पाव आणून खात असाल तर सावधान... तुम्ही विकत घेतलेल्या पावात मेलेली माशी सापडू शकते. होय हे अगदी खरं आहे, कारण बदलापुरात असा प्रकार घडलाय. बदलापूरच्या खरवईमध्ये एका व्यक्तीनं दुकानातून विकत घेतलेल्या पावात मेलेली माशी आणि फॉईल पेपरचा तुकडा आढळून आलाय. या प्रकारानं लोकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

बेकरीतील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बदलापूरच्या खरवई परिसरात एका दुकानातून खरेदी केलेल्या पावात मेलेली माशी आणि फॉईल पेपरचा तुकडा आढळल्याने नागरिकांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. बदलापुरातल्या खरवईत राहणाऱ्या विनय गायकवाड यांनी आपल्या घरी भुर्जी पावाचा बेत आखला होता. तिथल्याच नाक्यावरच्या दुकानातून त्यांनी काही पाव खरेदी केले. मात्र त्यातल्या एका पावात चक्क मेलेली माशी आढळून आली. तर दुसऱ्या पावात फॉईल पेपरचा तुकडा सापडला. सुदैवानं वेळीच हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी ताबडतोब हे पाव दुकानदाराला दाखवले. तसंच त्याला समजही दिली.

या घटनेने बेकरी उत्पादनांमधील अस्वच्छतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. बेकरीत पाव, खारी, टोस्ट यासारखे पदार्थ बनवताना स्वच्छतेचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. परंतु, अनेक बेकरी चालक याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होतो. अशा प्रकारांमुळे खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होतात. स्थानिक नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवून कडक कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने कारवाई करून संबंधित बेकरीची तपासणी करावी आणि दोषींवर कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. नागरिकांनीही बेकरीतून खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून अशा घटनांना आळा बसू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT