Crime , Badlapur  Saam TV
मुंबई/पुणे

Badlapur News: 'त्या' एका गोष्टीचा राग इतकी वर्षे मनात होता, ९ वर्षांनंतर केला माजी नगरसेवकावर हल्ला

पिस्टल दाखवत दिली हाेती जीवे मारण्याची धमकी दिली.

अजय दुधाणे

Badlapur : बदलापुरातील (badlapur) माजी नगरसेवकावर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी एका संशयित आरोपीस अटक (arrest) केली आहे. पूर्ववैमनस्यातून माजी नगरसेवक अविनाश मोरे यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पाेलिसांकडून (police) देण्यात आली. दरम्यान या घटनेतील मुख्य संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून २ पथकं रवाना झाली आहेत. (badlapur latest marathi news)

या घटनेबाबत पाेलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी - बदलापूरमधील माजी नगरसेवक अविनाश उर्फ आऊ मोरे हे मंगळवारी रात्री शिरगाव आपटेवाडी परिसरातून कारने त्यांच्या घरी जात होते. यावेळी महेंद्र उर्फ पप्पू बागुल, अरबी विशाल आचार्य या दोघांनी मोरे यांच्या गाडीला आडवी घातली. यानंतर पप्पू बागुल याने मोरे यांच्याजवळ जात त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. तसंच पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी माेरे यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदवली हाेती. बदलापूर पूर्व पोलिसांनी तपासाची चक्रं वेगानं फिरवत विशाल आचार्य याला त्याच्या गाडीसह ताब्यात घेतलं. त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली.

सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव म्हणाले या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पप्पू बागुल याने २०१३ साली शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी म्हात्रे यांचे समर्थक असलेल्या आऊ मोरे यांनी बदलापूर बंदची हाक दिली होती. त्याच रागातून मोरे यांच्यावर ९ वर्षांनी हल्ला केला असे तपासात समाेर आले आहे.

पप्पू बागुल हा सराईत गुंड आहे. त्याच्यावर आत्तापर्यंत आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या शोधासाठी आता पोलिसांनी २ पथकं रवाना केली आहेत असेही सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांती स्पेशल तीळ बाजरीची भाकरी बनवा, वाचा सोपी पद्धत

Early Morning Stroke Symptoms: सकाळी उठल्यावर ही लक्षणे दिसल्यास असू शकतो ब्रेन स्ट्रोकचा धोका; वेळीच घ्या काळजी

Pune Traffic: पुणेकरांठी महत्वाची बातमी! बोपदेव घाट आजपासून ७ दिवसांसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?

मुंबईच्या विकासाची सुरूवात नागपूरकरामुळे, देवेंद्र फडणवीस यांनी मांडला हिशोब, वाचा राज ठाकरेंना काय दिले उत्तर

Clothes Cleaning Tips: वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याच्या या 5 स्मार्ट टिप्स तुम्हाला माहितीयेत का?

SCROLL FOR NEXT