Manasvi Choudhary
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
कपडे धुण्यापेक्षा 'फॅब्रिक केअर' ची विशेष काळजी घेतली जाते. कपडे धुण्याच्या काही लेटेस्ट आणि ट्रेडिंग टिप्स जाणून घ्या
सध्या पर्यावरणासाठी सिंथेटिक कपड्यांतून निघणारे सूक्ष्म कण टाळण्यासाठी मशीनमध्ये विशेष फिल्टर किंवा 'वॉशिंग बॅग' वापरणे ट्रेंडिंग आहे.
गरम पाण्यामुळे कापड खराब होते, म्हणून आता ९०% कपडे फक्त थंड पाण्यात धुण्याचा ट्रेंड आहे. यामुळे वीजही वाचते आणि रंगही टिकतो.
केवळ पांढरे आणि रंगीत कपडे वेगळे न करता, आता कपड्यांच्या पोतानुसार वेगळे करा. जिमचे कपडे . नाजूक , जीन्स हे कपडे वेगळे करा.
जीन्स, प्रिंटेड टी-शर्ट्स किंवा एम्ब्रॉयडरी असलेले कपडे नेहमी उलटे करून धुवा. यामुळे कपड्याची बाहेरील बाजू घासली जात नाही आणि रंग टिकून राहतो.
पावडर डिटर्जंटऐवजी लिक्विड डिटर्जंट वापरल्याने कपड्यांवर पांढरे डाग पडत नाहीत.