Manasvi Choudhary
सकाळी तुम्ही चेहऱ्याची योग्यप्रकारे मालिश केल्याने चेहऱ्याचं सौंदर्य खुलते.
घरीच चेहऱ्याची मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते.
पफ योर चीक्स मध्ये डात हवा भरा आणि दोन्ही गााल फुगवा. आता ही हवा एका गालातून दुसऱ्या गालात फिरवा. ३० सेकंद हे करा यामुळे गालाचे स्नायू टोन होतात आणि रक्ताभिसरण वाढल्याने चेहऱ्यावर चमक येते.
फिश फेस तुमचे गाल आत ओढा आणि माशासारखा चेहरा बनवा. या स्थितीत ५-१० सेकंद राहा आणि हसा. ५ वेळा पुन्हा करा यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही.
'व्ही' पोज फेस योगामध्ये दोन्ही हातांची तर्जनी आणि मधले बोट डोळ्यांच्या कोपऱ्यात 'V' आकारात ठेवा. डोळ्यांच्या बाहुल्या वरच्या बाजूला बघा आणि डोळे मिचकावा.
फोरहेड स्मूदर कपाळावर दोन्ही हातांची बोटे ठेवा आणि बाहेरच्या बाजूला हळुवार ओढा.
किस द स्काय फेस योगामध्ये मान वर करा आणि छताकडे बघून हवेत 'किस' केल्यासारखे ओठ फिरवा. १० वेळा करा.