बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने तेजस्वी शिवतारा निखळला : राज्यपालांची शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली रश्मी पुराणिक
मुंबई/पुणे

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने तेजस्वी शिवतारा निखळला : राज्यपालांची शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : लोककल्याणकारी छत्रपती शिवरायांचे चरित्र आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जागविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे उत्तुंग प्रतिभेचे अलौकिक व्यक्तित्व होते. त्यांचे भावविश्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारावले होते. त्यांच्या प्रत्येक श्वासात महाराजांचा ध्यास होता. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या लिखाणातून, व्याख्यानांमधून तसेच 'जाणता राजा' सारख्या महानाट्यामधून त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे पुण्यकार्य केले आहेत.

हे देखील पहा-

अलीकडेच शिवसृष्टी या ठिकाणी भेट दिली असताना व त्यानंतर एका पुरस्कार सोहळ्यासाठी ते राजभवन येथे आले असताना त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे भाग्य लाभले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने भारतवर्षाच्या आसमंतातील एक तेजस्वी शिवतारा निखळला आहे. त्यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी साकारणे व शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वदूर पोहोचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

महाराष्ट्रात येऊन शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे व त्यांचा स्नेह आपणांस मिळणे ही आपली जीवनातली एक मोठी उपलब्धी आहे, असे आपण मानतो. त्यामुळे त्यांचे निधन हे आपल्याकरिता वैयक्तिक स्तरावर देखील दुःखदायक आहे. या दुःखद प्रसंगी आपल्या तीव्र शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Maharashtra News Live Update: पंढरपूरात पैशाची मागणी करत हल्ला; गाडीची तोडफोड

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

ITR Filing 2026 : पगार १२.७५ लाखांपर्यंत असला तरीही भरावे लागेल टॅक्स, काय त्यामागचं नेमकं कारण?

Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT