Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात यूटीआय (मूत्रमार्गाचा संसर्ग) टाळण्यासाठी जास्त आर्द्रता आणि दमट हवामानापासून स्वतःचे रक्षण करा. कारण यामुळे शरीरावर ओलावा अडकून राहतो आणि जिवाणूंच्या वाढीस चालना मिळते. संसर्ग टाळण्यासाठी हे उपाय आताच फॉलो करा.

rainy season | pinterest

ओले कपडे बदला

पावसामुळे कपडे दमट होतात. दमट किंवा ओलसर कपड्यांमध्ये बसल्याने जिवाणूंची वाढ होते. त्यामुळे ताबडतोब कपडे बदला आणि अंग कोरडे करा.

Change into wet clothes | pinterest

सुती अंतर्वस्त्र

सिंथेटिक कापड्यांऐवजी हवेशीर, सुती अंतर्वस्त्रे वापरा, कारण सिंथेटिक कापड पावसाळ्यात ओलावा आणि उष्णता अडकवून ठेवतात.

Cotton underwear | pinterest

पुरेसे पाणी प्या

दररोज २ ते ३ लिटर पाणी प्या. पुरेसे पाणी प्यायल्याने तुमची लघवी पातळ राहते आणि मूत्रमार्गातील जिवाणू नियमितपणे बाहेर टाकले जातात.

Drink enough water | pinterest

लघवी रोखून धरू नका

जास्त वेळ लघवी रोखून धरणे टाळा. वारंवार लघवी केल्याने मूत्राशयात जिवाणूंची वाढ होण्यापूर्वीच ते बाहेर टाकले जातात.

Do not hold back urine | pinterest

स्वच्छ शौचालयाचा वापरा

पावसाळ्यात सार्वजनिक शौचालयामुळे यूटीआय (मूत्रमार्गाचा संसर्ग) चा धोका वाढतो. सार्वजनिक जागा पटकन निर्जंतुक करण्यासाठी टॉयलेट सॅनिटायझर स्प्रे सोबत ठेवा.

Public toilets | pinterest

सुगंधरहित साबण

तीव्र, जास्त सुगंध असलेले साबण किंवा इंटिमेट वॉश वापरणे टाळा. ते त्वचेच्या पीएच पातळीत बदल घडवतात आणि जिवाणू किंवा यीस्ट संसर्गास प्रोत्साहन देतात.

Unscented soap | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

Urinary Problems In Monsoon | AI PHOTO
येथे क्लिक करा...