Nitesh Rane Vs Sanjay Raut
Nitesh Rane Vs Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut: बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रातला; संजय राऊतांच्या वक्तव्याने नवा वाद, नितेश राणे म्हणाले...

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सुशांत सावंत, मुंबई

Sanjay Raut Controversial Statement: राज्यात महारापुरुषांबाबत अवमानाचा मुद्दा तापला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवाजी महाराजांपासून ते महात्मा ज्योतिबा फुले अशा अनेक महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार आणि भाजपविरोधात रान उठवलं आहे. मात्र, अशात आता खुद्द शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीच एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

''बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला'' असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहे. मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला नसून त्यांच्या जन्म मध्य प्रदेश राज्यातील महू या गावात झाला आहे. त्यामुळे राऊतांनी केलेल्या खोट्या दाव्यामुळे विरोधकांनी राऊतांविरोधात रान उठवलं आहे. (Sanjay Raut Latest News)

याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नितेश राणे यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. यात संजय राऊत पत्रकारांशी बोलताना दिसत आहेत. पत्रकारांना प्रतिक्रीया देत असतान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला असं राऊत बोलून गेले. राऊतांच्या याच वक्तव्यावरुव विरोधकांनी राऊतांना धारेवर धरलं आहे. (Latest Marathi News)

कारण संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य साफ चुकीचं आहे. मुळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू या गावात झाला. मात्र, राऊतांनी आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असल्याचा दावा करत राऊतांनी नवा वाद ओढावून घेतला आहे.

याप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली. "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे या मूर्खाला माहीत नाही? तो म्हणतो बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाला. हा महापुरुषांचा अपमान नाही का ? माफी मागा!!!" असं ट्विट करत आमदार नितेश राणे यांनी राऊतांना धारेवर धरलं आहे. (Breaking Marathi News)

संजय राऊत नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

राऊतांनी आंबेडकरी जनतेची नाक घासून माफी मागावी: प्रवीण दरेकर

दुसरीकडे भाजप आमदार प्रविण दरेकर यांनीदेखील राऊतांवर हल्लाबोल केला आहे. दरेकर म्हणाले, संजय राऊत यांनी जी अक्कल पाजळली आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो. आता कुठल्या तोंडाने तुम्ही सांगणार आहात आम्ही मोर्चा काढतो. संजय राऊत यांनी नाक घासून आंबेडकरी जनतेची माफी मागावी अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. तसेच संजय राऊत जर मोर्चात सहभागी होत असतील तर त्यांनी आधी दिलगिरी व्यक्त केली होती. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट... आपण केलेले कृत्य एवढंसं आणि इतरांनी केले तर आंदोलन करणार असा टोलाही दरेकरांनी राऊतांना लगावला आहे.

महापुरूषांचा असा अपमान तुम्ही करायचा आणि स्वतःचं मोर्चे काढायचे?- चित्रा वाघ

याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही संजय राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतल आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही तर मध्यप्रदेशातील महू येथे झालाय. इतकं सामान्य ज्ञान रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणाऱ्या सर्वज्ञानींना असू नये ?? आमचे आदर्श असणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेबांबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवताय? महापुरूषांचा असा अपमान तुम्ही करायचा आणि स्वतःचं मोर्चे काढायचे? मुर्ख समजू नका…महाराष्ट्र तुम्हाला पुरतां ओळखून आहे तुमचा जाहिर निषेध ..!

दरम्यान, महापुरुषांचा वारंवार होणारा अपमान, कर्नाटक सीमाप्रश्न, महिलांचा होत असलेला अपमान, महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवल्याच्या पार्श्वभूमीवर निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीचा 17 डिसेंबर रोजी महामोर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चाच्या मार्गाची पाहणी करण्यासाठी आणि नियोजनासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी क्रूडास अँड रिचर्डसन ठिकाणी आले आहेत. अनिल परब, मिलिंद नार्वेकर, किशोरी पेडणेकर, सचिन अहिर, सुनील शिंदे आणि इतर पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Fire News : धुळ्यात फटाका गोडाऊनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

IPL 2024, KKR vs SRH: कोलकाता की हैदराबाद; कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? पाहा प्लेऑफमध्ये दोन्ही संघांचा रेकॉर्ड

EPFO New Rule: पीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला मिळणार पैसे मिळणं झालं आणखी सोपं; कसं? जाणून घ्या

Kyrgyzstan News मोठी बातमी! किर्गिस्तानमध्ये हिंसाचार उफाळला; संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले

Pune Hit and Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरणाचा आणखी एक व्हिडिओ आला समोर, संतप्त नागरिकांनी केली होती कारची तोडफोड

SCROLL FOR NEXT