CM Eknath Shinde On PM Modi Saam Tv
मुंबई/पुणे

Ayodhya Ram Mandir: प्रधानमंत्री मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Shinde On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी श्री अयोध्या धाम मधील रामलल्ला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

CM Shinde On PM Modi:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी श्री अयोध्या धाम मधील रामलल्ला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. अयोध्येत श्री रामजन्मभूमी मंदिर बांधण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. समस्त विश्व गायत्री परिवार राष्ट्रात सनातन संस्कृतीचा प्रसार करून विश्व बंधुतेचा संदेश देत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

अखिल विश्व गायत्री परिवारातर्फे आयोजित अश्वमेध महायज्ञ ज्ञान मंच येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले आहेत. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अश्वमेध महायज्ञ आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखिल विश्व गायत्री परिवाराचे आभार मानले. यासाठी देवभूमी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असे सांगितले. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे मन मोठे असले पाहिजे, असे सांगितले. कारण मन मोठे झाले की, सर्व संकटे आपोआप दूर होतात. या विचाराने केलेले कार्य समाज आणि राष्ट्राच्या विकासाकडे घेऊन जाते. अखिल विश्व गायत्री परिवारातील प्रत्येक सदस्य याच विचाराने कार्य करीत असून जगाला विश्वबंधुतेचा संदेश देत आहे. (Latest Marathi News)

अश्वमेध महायज्ञाच्या उपयुक्तततेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अशा कार्यक्रमांमुळे पुण्य वाढते आणि दुर्गुण कमी होतात. प्रधानमंत्री मोदींच्या आर्थिक धोरणांचे कौतुक करताना ते म्हणाले की, देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने पुढे नेले आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, राजकीय व्यक्तींनी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यांना अशा कार्यक्रमातून दशा आणि दिशा मिळते. राजकारण हे राज आणि नीती या दोन शब्दांपासून बनलेले आहे, ज्याचा अर्थ राज्य आणि समाजाला योग्य मार्गावर नेणे. अशा घटना ही व्यवस्था मजबूत करण्याचे काम करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT